अमळनेर:- शहरात ईद व अक्षय तृतीयेच्या निमीत्ताने संवेदनशील भागातून पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला.
दिनांक २१ एप्रिल रोजी संध्याकाळी रमजान ईद व अक्षय तृतीया (आखाजी) या आगामी सणांच्या अनुषंगाने शहरातील संमिश्र व संवेदनशील भागातून पोलीस रुट मार्च घेण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला. सदर रूट मार्चमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रॅपिड ऍक्शन फोर्स मुंबईचे ५ अधिकारी व ९७ कर्मचारी, पोलीस ठाण्यातील ४ दुय्यम अधिकारी व ५० अंमलदार, २४ होमगार्ड असे एकूण १८० पोलीस व फोर्स सह रूट मार्च घेण्यात आला.