
चिमणपुरी पिंपळे येथेही पहाटे जुगार खेळणाऱ्या आठ जणांना घेतले ताब्यात
अमळनेर : स्मशानभूमीत पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या सात जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडून ८ मोटरसायकलींसह जुगारातील पैसे असा एकूण २ लाख ८३ हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला. तसेच चिमणपुरी पिंपळे येथे २७ रोजी पहाटे जुगार खेळणाऱ्या आठ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ३० हजार ४०० रुपये असा एकूण ३ लाख १० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
२५ एप्रिल रोजी परिविक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले याना गुप्त माहिती मिळाली की चोपडा रोडवरील स्मशानभूमीत पत्त्यांचा जुगार खेळत आहेत. त्यांनी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार , विनोद संदानशिव , निलेश मोरे ,जितेंद्र निकुंभे , उज्वलकुमार म्हस्के , अमोल पाटील , मंगल भोई , प्रशांत पाटील यांना छापा मारण्यासाठी पाठवले. ४ वाजून १० मिनिटांनी पोलिसांनी स्मशानभूमीत छापा टाकला असता प्रवीण शेखर पाटील रा ताडेपुरा , जितेंद्र गोपाल पाटील रा पैलाड , आबा किसन भोई रा भोईवाडा पैलाड , अक्षय हिम्मत पाटील शिवाजीनगर पैलाड , गोकुळ प्रभाकर सुतार रा भवानीमाता मंदिर पैलाड , शरद गोविंदा पाटील रा शनिपेठ पैलाड , दिनेश भिका धनगर रा शनीपेठ पैलाड हे अंदर- बाहर नावाचा पत्त्यांचा जुगार खेळताना आढळून आले. त्याच्याजवळून जुगारातील २३ हजार रुपये आणि २ लाख ६० हजार रुपये किमतीच्या आठ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. पोलिसांनी मुबई जुगार कायद्याप्रमाणे सातही जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत.
त्याचप्रमाणे परिविक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले याना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे , हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार ,उज्वल म्हस्के , विनोद संदानशीव ,प्रशांत पाटील , निलेश मोरे , मंगल भोई , यांनी २७ रोजी पहाटे १ वाजून ३० मिनिटांनी चिमणपुरी पिंपळे येथे नदीच्या काठावर गावठाण जागेवर लाईट च्या खांब्याखाली घोळक्याने अंदर बाहर नावाचा जुगार सुरू असल्याचे दिसले. पोलिसांनी स्वप्नील मधुकर पाटील वय २५ रा आटाळे , किरण प्रेमराज पाटील वय २५ रा मंगरूळ , सचिन संतोष सैंदाणे वय ३४ रा पिंपळे , भाऊसाहेब नामदेव पाटील वय ५१ रा पिंपळे , योगेश धोंडू पाटील वय ४१ रा आटाळे , चंद्रकांत दिनकर राजपूत वय ३९ रा पिंपळे, अभिमन दशरथ पाटील वय ५५ , ज्ञानेश्वर रामदास भिल वय २५ दोन्ही रा पिंपळे याना अटक करून त्याच्याजवळील ३० हजार ४०० रुपये जप्त करण्यात आले आहेत. आठही जणांविरुद्ध मुंबई जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

