
अमळनेर:- तालुक्यातील बोरगाव येथील रहिवासी असलेल्या निक्षिता पाटील व मोहीत पाटील या बहिणभावाचा कल्याण येथील अचिवर्स कॉलेज ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट या महाविद्यालयात झालेल्या वर्ल्ड ह्यूमनिटी कमिशन (यूएसए) यांच्यातर्फे एक्सेलेंट स्टुडन्ट नॅशनल अवॉर्ड देऊन गौरव करण्यात आला.
26 एप्रिल शनिवार रोजी हा सोहळा संपन्न झाला. निक्षिता व मोहीत या दोन्ही बहीणभावानी आतापर्यंत विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश संपादन केलं आहे. डान्स स्पर्धा , तलवारबाजी, स्केटिंग, अशा विविध कला व क्रीडा प्रकारात यश संपादन केले आहे. यावेळी याची अचिवर्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सी ए महेश भिवंडीकर , आमदार विश्वनाथ आत्माराम भोईर, डॉ. सोन्या पाटील, नगरसेवक जयवंत दादा भोईर (कल्याण डोंबिवली मनपा), नगरसेवक सचिन खेमा, दीपक शेठ लोखंडे (जिल्हाध्यक्ष भाजपा वाहतूक सेना ठाणे), प्रा. प्रमोद पाटील (कार्यक्रमाचे मुख्य आयोजक) आदींचे हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला कुमारी निक्षिता पाटील व कुमार मोहीत पाटील सर्वच स्तरावर अभिनंदन करण्यात येत आहे.

