
अमळनेर :- अमळनेर तालुक्यातील बारावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून परीक्षेला बसलेल्या ३ हजार ४३२ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार २७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा एकूण निकाल ९५.८३ टक्के लागला आहे.यात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नगाव गडखांब ता अमळनेर,श्री साई ज्युनिअर कॉलेज देवगाव देवळी ता.अमळनेर व यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा पिंपळे ता.अमळनेर या ३ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.तर श्री बी.बी.ठाकरे उच्च माध्यमिक विद्यालय वावडे ता.अमळनेर या शाळेचा निकाल शून्य टक्के लागला आहे.


यात प्रताप महाविद्यालय अमळनेर ९७.५५ टक्के,सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय ९५.७१ टक्के, अमळनेर कर्मवीर दादासाहेब गायकवाड महाविद्यालय ९२.७ टक्के ,जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय अमळनेर ९६.८७ टक्के , ,श्री दत्त विद्यामंदिर पातोंडा ता अमळनेर ८८.८८ टक्के ,हिरामण जीवन पाटील ज्युनिअर कॉलेज शिरसाळे ता.अमळनेर ८० टक्के,नवभारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दहिवद ता.अमळनेर ९०.४७ टक्के,स.ही मुंदडा व डी एफ साळुंखे उच्च माध्यमिक विद्यालय मारवड ७९.२४ टक्के,श्री बी.बी.ठाकरे उच्च माध्यमिक विद्यालय वावडे ता.अमळनेर ०० टक्के ,शारदा माध्यमिक विद्यालय व एन. एम कोठारी उच्च माध्यमिक विद्यालय कळमसरे ७६ टक्के,आदर्श विद्यालय अमळगाव ८८.३१ टक्के ,किसान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जानवे ता.अमळनेर २७.२७ टक्के,आदर्श हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज मांडळ ता.अमळनेर ९६.७७ टक्के,श्री शिवाजी हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज अमळनेर ८८.४६ टक्के,अल फाईज उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज अमळनेर ९८.०७,अ.अ.पाटील माध्यमिक व ए. पी.दिघावकर उच्च माध्यमिक विद्यालय मंगरूळ ता.अमळनेर ८३.३३ टक्के,उच्च माध्यमिक आश्रम शाळा गडखांब ता अमळनेर ९७.५४ टक्के,विजय नाना पाटील आर्मी स्कुल व उच्च माध्यमिक विद्यालय अमळनेर ९६.१० टक्के,एन टी मुंदडा ज्युनिअर कॉलेज अमळनेर ९८.४५ टक्के,कै. भालेराव आर पाटील ज्युनिअर कॉलेज मारवड ता.अमळनेर ९९.६१ टक्के,गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कुल मुडी ९७.६४ टक्के ,प्रताप महाविद्यालय किमान कौशल्य शाखा ६५.३८ टक्के ,आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अमळगाव ता.अमळनेर ( किमान कौशल्य शाखा) ८७.५० टक्के असा ९५.८३ टक्के निकाल लागला आहे.

