
किसान युवा क्रांती संघटनेतर्फे करण्यात येणार शेतकऱ्यांचा गौरव…
अमळनेर:- किसान युवा क्रांती संघटनेतर्फे आदर्श शेतकरी पुरस्कार देण्यात येणार असून त्यासाठी नामांकन अर्ज पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
खान्देशातील कोरोना संकट काळात अनेकांचे रोजगार, व्यवसाय बंद झालेत. याचा परिणाम शेती व्यवसायावरही झाला. परंतु काही शेतकऱ्यांनी उत्तम शेती उत्पादन घेऊन देशातील, राज्यातील नागरिकांना फळे, भाजीपाला, अन्नधान्य, दूध इत्यादी पुरवठा अखंड सुरू ठेवून कधी तूट पडू दिली नाही. म्हणून त्यांच्या अशा उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन किसान युवा क्रांती संघटना धुळे शाखेतर्फे आदर्श शेतकरी पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. यासाठी नामांकन अर्ज पाठविण्याचे आवाहन करण्यात येत असून सदर पुरस्कार जून महिन्यात वितरित करण्यात येतील. त्यासाठी ३१ मे २०२२ पर्यंत खान्देशातील व राज्यातील शेतकऱ्यांनी आपली सविस्तर माहिती तालुक्यातील डांगरी येथिल रहिवासी व किसान युवा क्रांती संघटना धुळे अध्यक्ष प्रमोद रमेश पाटील ( संपर्क क्रमांक ९८८११९४८१६) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.







