
चौधरी कुटुंबीयांनी २६ वर्षांची परंपरा आजही जोपासली
अमळनेर:- संत सखाराम महाराज यांच्या यात्रोत्सवाचे औचित्य साधून अमळनेर येथील चौधरी कुटुंबीयांनी यंदाही अन्नदानाची पुढे खंडित झालेली परंपरा पुढे सुरू ठेवत, हजारो भक्तांना पिठलं-भाकर पासून सुरू केलेली परंपरा ते बटाटा बाजी भाजी पोळी लोणच्याच्या मनमुराद आस्वाद दिला. २६ वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा वर्षागणिक अधिक व्यापक होत असून, यावर्षी तब्बल ११ क्विंटल गहू, १० क्विंटल बटाटे, दीड क्विंटल लोणचं १० तेल डब्बे, २ क्विंटल टमाटे आणि १०० पाण्याचे जार वापरून हे अन्नदान संपन्न झाले.

ही परंपरा चौधरी कुटुंबाच्या पूर्वजांनी, विशेषतः केशराबाई झगडू चौधरी यांनी पिठलं भाकर त्यावेळी येणाऱ्या भाविकांना सुरू केली होती. त्यांच्या काळात केवळ १ क्विंटल गव्हापासून सुरू झालेलं अन्नदान आता ११ क्विंटलपर्यंत वाढलं आहे, ही बाब अत्यंत गौरवास्पद आहे. पिठलं-भाकर, बटाटा भाजी-पोळी आणि लोणचं या पारंपरिक जेवणाचा आस्वाद पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या भाविकांपासून ते यात्रेसाठी आलेल्या ग्रामीण व शहरी भागातील गरजू नागरिकांनी घेतला.

दि. ११ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते. समाधी शेजारी असलेल्या महादेव मंदिराच्या मागील पटांगणात सुमारे ८० मजुरांच्या मदतीने ही सेवा पार पडली. भाविकांच्या चेहऱ्यावरची समाधानी आणि तृप्तीची भावना हेच या सेवाकार्याचे खरे यश आहे.
चौधरी कुटुंबीयांनी आपल्या पूर्वजांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि समाजासाठी काहीतरी करण्याच्या भावनेतून या परंपरेला गतवैभव देत ठेवले आहे. अन्नदान हे सर्वोत्तम दान मानले जाते आणि या कार्यातून एकात्मता, सेवा, आणि श्रद्धा यांचा सुंदर संगम पहावयास मिळतो.


