
अमळनेर(प्रतिनिधी):- येथील पालिकेच्या निवडणुकीत चिन्ह वाटप करण्याच्या दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप प्रणित शहर विकास आघाडी व शिवसेनेतच मुख्य लढत असणार आहे.महाविकास आघाडीकडून शिवसेना ( उबाठा) तर्फे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार रिंगणात आहे.

अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी ६ उमेदवार रिंगणात आहेत. यात
१)जितेंद्र ठाकूर – शहर विकास आघाडी (शिट्टी)
२) डॉ.परिक्षीत बाविस्कर – शिवसेना(धनुष्यबाण)
३) राधाबाई पवार – शिवसेना उबाठा(मशाल)
४)उमाकांत ठाकूर- अपक्ष (दूरदर्शन संच)
५) अमोल भील- अपक्ष(ऑटो रिक्षा)
६)सखुबाई भील – अपक्ष (गॅस सिलेंडर) हे उमेदवार रिंगणात आहेत.
पालिकेच्या १८ प्रभागातील ३६ जागांपैकी शहर विकास आघाडीची एक जागा बिनविरोध निघाली आहे.३५ जागांसाठी १२८ उमेदवार रिंगणात असून,शहर विकास आघाडीत व शिवसेनेत चुरस आहे. नगरसेवक पदाच्या ३५ जागांसाठी शहर विकास आघाडीतर्फे ३५,शिवसेनेतर्फे २९,शिवसेना उबाठा तर्फे ५, राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे २, काँग्रेस तर्फे १, आम आदमी पक्ष १ तर ५५ उमेदवार अपक्ष निवडणूक लढवित आहेत.काही अपक्षांना शिवसेनेने पाठिंबा देऊन पुरस्कृत केले आहे.
अनेक प्रभागात अपक्षांना बॅट,छताचा पंख, कपबशी, फुगा,नारळ,छत्री यासह इतर चिन्हांचे वाटप झाल्याने आता निवडणुकीत रंगत वाढणार आहे.

