
अमळनेर:- शहर आणि तालुक्यातील काँग्रेस सह शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन,खासदार स्मिता वाघ यांच्या उपस्थितीत मुंबई येथे भाजपात प्रवेश केला.

काँग्रेसच्या तिकिटावर ज्यांनी विधानसभेची उमेदवारी केली ते डॉ अनिल शिंदे,त्यांचे अनेक समर्थक भाजपात दाखल झाले आहेत, तर शरद पवार राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष माजी नगरसेवक श्याम जयवंतराव पाटील आणि त्यांचे समर्थकानी भाजपात प्रवेश केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे ,माजी आमदार शिरीष चौधरी यांचे समर्थक असलेले माजी उपनगराध्यक्ष पांडुरंग महाजन यांनी देखील स्मिताताई वाघ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपात प्रवेश केला आहे,.

भाजपात प्रवेश करणारे कार्यकर्ते पुढील प्रमाणे: समाधान कणखरे शहर कार्याध्यक्ष काँग्रेस, नरेंद्र शिवाजीराव पाटील, सरपंच, गांधली, सुनील गुलाबराव पवार, माजी सरपंच पातोंडा, डॉ हिम्मत वसंत सूर्यवंशी, तालुका अध्यक्ष इलेक्ट्रोपॅथी डॉक्टर संघटना, विनोद गुलाबराव पाटील, चेअरमन विकास सोसायटी, कलाली, रणछोड छगन पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य, पाडळसरे, डॉ पुरुषोत्तम सुभाष सूर्यवंशी, माजी सरपंच, कंडारी, अख्तर राजक तेली, शिवसेना उबाठा विद्यार्थी सेना शहर प्रमुख, दयाराम आनंदराव पाटील,जिल्हाध्यक्ष – राष्ट्रवादी शिक्षक सेल,जळगाव, अक्षय विजय चव्हाण,अध्यक्ष -राजमुद्रा फाउंडेशन, दर्पण चंद्रकांत वाघ, माजी शहराध्यक्ष,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, कुणाल आबा चौधरी, शहर कार्याध्यक्ष युवक काँग्रेस,अमळनेर अनिरुद्ध किशोर शिसोदे, जिल्हाउपाध्यक्ष-राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, यांच्यासह संभाजी पाटील, अरुण पाटील, अशोक साळुंखे, ईश्वरालाल नेरकर, शुभम पवार, कल्पेश पाटील, उज्वल मोरे, अधिकराव पाटील, कुणाल पाटील, अमोल राजपूत, सारंग लोहार, निखिल सूर्यवंशी, कमलेश पाटील, अभिषेक पाटील, सुमित पाटील, यश हापसे, मयूर चौधरी, पराग पाटील, तन्मय पाटील, अक्षय पाटील, या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. गेल्या आठवड्यात काही नेत्यांनी आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता त्यानंतरही काँग्रेस आणि शरद पवार गटातून गळती सुरूच आहे.

