
अमळनेर :- तालुक्यातील शिरूड येथे विविध क्षेत्रातील गुणवंत तसेच माध्यमिक शाळांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक एन टी पाटील हे होते.

शिरुड येथील श्री दत्त सार्वजनिक वाचनालय व ग्रामस्थ शिरूड यांच्या वतीने सदर गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. सर्वप्रथम पहेलगाम हल्ल्यात शहीद झालेले जवानांना व गावातील मयत नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. श्रद्धांजलीचा प्रस्ताव दत्त सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी मांडला तर प्रास्ताविक डी ए धनगर यांनी केले. त्यानंतर व्ही झेड पाटील हायस्कूलचा शंभर टक्के निकाल लागल्याबद्दल मुख्याध्यापक अनिल पाटील, बोरसे सर व योगिता देशमुख मॅडम व इतर सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये रोहिणी नंदलाल कुंभार, निखिल रवींद्र माळी ,आदिती दिलीप पाटील, भाविका प्रकाश पाटील तनया जयवंत पाटील, देवराज पंकज पाटील, देवांगी सुरेश सुतार यांचा पालकांसमवेत शाल ,पुस्तक व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी देवराज पाटील, निखिल माळी, आदिती पाटील या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच गावातील ग्रामस्थ अशोक बिर्हाडे, व्हि ए पाटील, अशोक पाटील प्रवीण बोरसे यांनी मनोगत व्यक्त केले. व्ही झेड पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल पाटील यांनी सत्काराला उत्तर दिले. माजी मुख्याध्यापक एन टी पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचलन डी ए धनगर यांनी तर आभार वाचनालयाचे अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी मांडले.
यावेळी प्रवीण बोरसे यांनी विद्यार्थ्यांना डायरी तर अशोक पाटील व अशोक बिराडे यांनी विद्यार्थ्यांना पुस्तके भेट दिली. तसेच गावातील दानशूर व्यक्ती विनायक गोटू पाटील यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रत्येकी शंभर रुपये भेट दिले.
यावेळी विकास सोसायटीचे चेअरमन बापूराव महाजन, गावाचे पोलीस पाटील विश्वास महाजन, वसंतराव पाटील, जयवंतराव पाटील विजय पाटील, दिलीप पाटील, श्रीराम पाटील, प्रल्हाद पाटील, सुकलाल पाटील, रघुनाथ धनगर, विजय बोरसे, अशोक पाटील, पंकज पाटील, ज्ञानेश्वर पाटील, बापूराव पाटील, पुंजू पाटील, साहेबराव पाटील, विश्वास पाटील, अलका पाटील, अनिता पाटील, सतीश पाटील, नारायण पाटील, अरुण पाटील, ग्रामसेवक एन आर पाटील, अनिल पाटील, ग्रंथपाल भास्कर दादा , सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस हजर होते.

