
अमळनेर:- येथील रोटरी क्लब आणि आधार बहुउद्देशीय संस्था यांच्या अंकुर सेवा सेतू प्रकल्पांतर्गत एचआयव्ही सह जगणाऱ्या अनाथ मुलांसाठी सकस आहार व प्रोटीन किट देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला सदर कार्यक्रमात ३० अति गरजू एचआयव्ही सह जगणाऱ्या अनाथ व एकलपालक बालकांना दर महिन्याप्रमाणे किराणा किट व प्रोटीन कीट देण्यात आले.
या कार्यक्रम अध्यक्षस्थानी इद्रिस हुसेन बोहरी हे होते या महिन्यात रोटरी क्लबचे अध्यक्ष ताहा बुकवाला व सौ.निसरीन बुकवाला यांचे चि.सैफुद्दीन बुकवाला यांच्या वाढदिवाच्या निमित्ताने ३० प्रोटीन किट वाटप करण्यात आले व या महिन्यातील सकस ३० कीराणा कीटचे वाटप आधार बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला रोटेरीयन अभिजीत भांडारकर यांनी प्रास्ताविक केले जात त्यांनी मुलांशी आरोग्य विषयक संवाद साधत दाते, व रोटरी आणि आधार संस्था ने सर्व मुलांना किराणा किट उपलब्ध करून दिले त्यांनी आपल्या मनोगता तून आज इतक्या मुलांपर्यंत पोहोचल्याने मदत केल्याचे खरे समाधान मिळत आहे त्यामुळे योग्य ठिकाणी आणि गरजूंपर्यंत मदत करणे किती महत्त्वाचे आहे असे सांगितले.व बोहरी परिवारातील फरिदा बोहरी तसनिम बोहरी जमीला सैफि तैखुम सैफि सर्व सदस्यांनी त्या मुलांच्या सोबत वाढदिवस साजरा केला , मुलांना दर महिन्याला प्रोटीन किट व सकस आहार वाटणे गरजेचे असल्याने अमळनेरा तील जास्तीत जास्त दात्यांनी या कार्यक्रमाशी जुडावे व गरजू मुलांपर्यंत आपली मोलाची मदत पोहोचवावी अशी आव्हान डॉ. भारती पाटील यांनी केले व मुलांशी संवाद साधला आधार संस्थेचे अध्यक्ष डॉ. भारती पाटील व कार्यकारी संचालक. श्रीमती रेणु प्रसाद रोटरी क्लबचे सदस्य देवेंद्र कोठारी महेश पाटील चेलाराम सैनानी आशिष चौधरी प्रेसिडेंट तहा बुकवाला यांनी सर्व दात्याचे आणि मान्यवरांचे आभार मानले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी आधार संस्थेचे दिपक संदानशिव संजय कापडे पुनम पाटील, आनंद पगारे व त्तोसिफ शेख अतीत जैन यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन प्रकल्प समन्वयक आश्वीनी सुर्यवंशी यांनी केले.

