ह.भ.प. प्रसाद महाराज यांचे ईद मिलन कार्यक्रमात प्रतिपादन….
अमळनेर:- “सर्व धर्मियांचा आदर करावा, त्यांना मान द्यावा त्यांच्याशी समानतेने वागावे ही शिकवण परम पूज्य सखाराम महाराजांची आहे. अमळनेरच्या रथाला पहिली मोगरी लावण्याचा मान मुस्लिम बांधवांनाच असतो हा एकात्मतेची जुनी आदर्श परंपरा कायम ठेवा” असे उदगार ह.भ.प. प्रसाद महाराज यांनी गांधली पुरा भागातील ईद मिलन कार्यक्रमात काढले.
या प्रसंगी अध्यक्ष स्थानी आमदार अनिल भाईदास पाटील हे होते. आल्लमा फ़ज़ले हक़ खैराबादी (रहे.) स्टडी सेंटर आणि पब्लिक लाइब्ररी तर्फे राष्ट्रीय एकात्मता ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक रियाज़ शेख म्हणाले की, गांधली पुरा भागातील सर्व धर्मीय वस्तीत पब्लिक लायब्ररी सुरु केल्याने शैक्षणिक वातावरण निर्माण झाले आहे, घटस्फ़ोटाच्या वाटेवर असलेल्या मुस्लीम कुटुंबांनां पुन्हा एकत्र करण्याचे काम केले जाते,रमजानचे महत्व सांगून अडीच टक्के जकात च्या माध्यमातून हजारो गोर गरिबांना मदत होते. ह.भ.प.प्रसाद महाराज कार्यक्रमास उपस्थित झाल्याने सर्वाना अत्यानंद झाला. या प्रसंगी डाॅ. बी.एस पाटील, स्मिता वाघ, मुफ्ती जाहिद हुसैन किबला, पी आय जयपाल हिरे, सुभाष चौधरी, प्रा. अशोक पवार,डाॅ अनिल शिंदे, ललिता पाटील,वसुंधरा लांडगे, अड. शकील काजी,दर्शना पवार, प्रितपाल सिंग बग्गा, फादर विनित वसावे, यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात आमदार अनिल पाटील म्हणाले की समाजात काम करतांना दैनंदिन व्यवहार मानवंतावादी असल्यास चागंल्या समाजाची निर्मिती होते. हजरत महंमद पैगंबरांनी 1400 वर्षापूर्वी करुणा व शांततेची शिकवण दिली,सखाराम महाराजांच्या यात्रेत मुसलमान बांधवांनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडावी जेव्हा अमळनेरचा सामाजिक कार्यक्रमाच्या इतिहास लिहिला जाईल तेव्हा ईद मिलन कार्यक्रमाची नोंद घ्यावी लागेल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड रज़्ज़ाक शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन अॅड रियाज़ काजी यांनी केले या प्रसंगी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, डाॅ भारती पाटील, खा.शि. कार्याध्यक्ष हरी भिका वाणी, प्रदीप अग्रवाल, भूत बापु,प्रताप शिंपी, सचिन पाटील, चंद्रकांत काटे, उमेश धनराळे, बन्सीलाल भागवत आण्णा, अॅड तिलोत्तमा पाटील, प्रा.विजय गाडे,अमोल माळी, पन्नालाल मावळे, सुनिल अहिरराव, नरेंद्र संदानशिव, प्रवीण जैन,सलीम टोपी,शेख हाजी, मुकतार खाटीक, फ़िरोज मिस्त्री, डाॅ. रुपेश संचेती, संतोष पाटील, सोमचंद संदानशिव,हाजी शब्बीर पहेलवान, संतोष लोहरे,गिरिश पाटील,श्री राम आबा, महेश पाटील, लालू सिन्धी,चंदू परदेसी, संजय चौधरी,भरत पवार,रणजित शिंदे सर,राजू शेख,रहिम तेली, हाजी लईक खान,रामराव पाटील, रहिम मिस्त्री, समाधान मैराळे, नूर पठाण जाकीर रद्दी वाले,अॅड साजिद शेख,अ.समद सर,जाकीर शेख, शरिफ शेख, इमरान खाटीक, सचिन बापु वाणी,मट्या खाटीक, आबिद अली सैय्यद, रियाज़ मिस्त्री, क़मा पलम्बर, मुस्तफा शेख,जहुर पलम्बर, जलाल पी.ओ.पी, मोहज़िम खान, इकबाल क़ुरेशी,नूरोद्दीन शेख, दिलावर मिस्त्री,रईस शेख, युसूफ पेंटर, अहमद पठाण,अलीम मुजावर, एजाज़ शेख,सुलतान भाई, शाहरूख सिंगर आदी मान्यवर उपस्थित होते.