अमळनेर:- लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृति – शताब्दी निमित्त प्रताप कॉलेज अमळनेर येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व १०० सेकंद स्तब्धता पाळून आदरांजली वाहीली.
महाराष्ट्र राज्याला दिशा देण्याचे काम छत्रपती शाहू महाराजांनी केले, सर्व जाती धर्मातील लोकांना समान न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करून जातीय सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच समाजकारण आणि प्रशासन यांच्या सर्वांगीण विकासाने पुरोगामी महाराष्ट्राचा पाया त्यांनी रचला. ६ मे १९२२ रोजी छत्रपती शाहू महाराजांचे निधन झाले. या घटनेला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. राज्यातील महाविकास आघाडी शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, आज त्यांच्या स्मृति शताब्दीदिन ठीक सकाळी १०.०० वाजता राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रताप महाविद्यालय येथे छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेजवळ १०० सेकंद स्तब्धता पाळून आदरांजली वाहिली. या वेळी प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य पी आर शिरोळे,उपप्राचार्य निकुंभ, वरिष्ठ लिपिक सचिन खंडारे, दि बी कांबळे, समता समितीचे अध्यक्ष समाधान मैराळे, बहुजन रयत परिषदेचे तालुकाध्यक्ष सुरेश कांबळे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष सनी गायकवाड, तालुकाध्यक्ष अनिरुद्ध शिसोदे, शहर संघटक दुर्गेश साळुंके, उज्वल निकम सारंग साळुंखे,भार्गव पाटील, अनिकेत पाटील,गौरव पाटील, दीपक पवार,बॉबी गायकवाड, विशाल काळे उपस्थित होते.