
उपस्थित मान्यवरांनी केले उपक्रमाचे कौतुक…
अमळनेर:- येथिल लोकमान्य टिळक शिक्षण संस्था संचलित, सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूल, मंगरूळ येथे तब्बल एक महिन्यापासून उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याचे समारोप संपन्न झाला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार स्मिता वाघ, शिक्षण विस्तार अधिकारी शर्मिला चव्हाण, माजी सैनिक अनिल पाटील, संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र बोहरा, प्राचार्या डॉ. मंजुळा नायर, विद्या बोहरा हे उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे स्मिता वाघ यांनी शिबिराचे आयोजनाचे कौतुक करून अमळनेर शहरातील विद्यार्थ्यासाठी उन्हाळी शिबीर संकल्पना ही कौतुकाची बाब आहे अस आपल्या मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष पाटील व शैलजीत शिंदे यांनी केले तर यशस्वितेसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.







