
अमळनेर:- तालुक्यातील एकलहरे येथील शेतीच्या रोहित्रातील डिझेल चोरून तीन लोखंडी खांब चोरट्यांनी पळविले असल्याची तक्रार मारवड पोलीसात करण्यात आली आहे.
फिर्यादी किशोर सुर्वे (कनिष्ठ अभियंता महावितरण) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि.७ मे रोजी सकाळी १० वाजता एकलहरे येथील वरिष्ठ तंत्रज्ञ प्रमोद पाटील यांचा फोन आला की, एकलहरे येथील लवकी नाक्याजवळ गावठाण जागेत शेती पंपाचा दोन रोहित्रातील ३०० लिटर डिझेल व तीन लोखंडी लघुदाब विद्युत वहिनी लोखंडी खांब चोरून नेले आहे. त्यावरून पाहणी केली असता सदरचा मुद्देमाल चोरी झाल्याचे आढळून आल्याने सुर्वे यांनी मारवड पोलीसात तक्रार दाखल केली आहे. यात ७५०० रुपये किमतीचे डिझेल व १५ हजार रुपये किमतीचे लोखंडी खांब असा २२ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध मारवड पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पो. ना. सचिन निकम हे करीत आहेत.







