अमळनेर:- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँगेस कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त अमळनेर दौऱ्यावर असताना कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या (ज्युक्टो) वतीने त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रताप महाविद्यालयीन शिक्षकांनी सहभागी होऊन चर्चा केली व सदर मागण्याबाबत सकारात्मक विचार करू असे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले. निवेदनात सन २००५ नंतरच्या नियुक्त सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना सरसकट लागू करावी. सातव्या वेतन आयोगामध्ये सुचविल्यानुसार शिक्षक संवर्गाला आश्वासित प्रगती योजना लागू करणे. शाळा संलग्न कनिष्ठ महाविद्यालयासाठी एका तुकडी साठी ६० व वरिष्ठ महाविद्यालय सलग्न कनिष्ठ महाविद्यालयासाठी ८० विद्यार्थी संख्या असावी. बक्षी समिती खंड-२ प्रकाशित करून राज्य सरकारी कर्मचारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांना लाभ त्वरित प्रधान करणे. २४ वर्षे सेवा झालेल्या सर्व शिक्षकांना विनाअट निवडश्रेणी द्यावी. ज्युनिअर कॉलेजांतील पात्र तुकड्यांना अनुदान द्यावे. शिक्षकांचे मासिक वेतन राष्ट्रीयीकृत बँकेतून करणे. माहिती व तंत्रज्ञान(आय.टी) विषयास अनुदान देण्यात यावे. आदी मागण्यांचा समावेश आहे. यावेळी प्राध्यापकांच्या सह्यांचे निवेदन पत्र देण्यात आले. निवेदन देताना संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक व प्रताप महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. यू.जी. मोरे, जळगाव जिल्हा ज्युक्टो संघटनेचे कार्याध्यक्ष-प्रा.सुनील पाटील, व जिल्हा प्रतिनिधी-प्रा.जी. एल. धनगर, प्रताप महाविद्यालयातील स्थानिक उपाध्यक्ष प्रा. एम्. एन्. भामरे मॅडम, सचिव प्रा.स्वप्निल पवार,प्रसिद्धीप्रमुख प्रा.किरण पाटील, कार्यकारणी सदस्य प्रा. विलास पाटील, प्रा.पंकज तायडे, प्रा.वसंत पाटील, प्रा.दिपक पवार व सर्व सन्माननीय प्राध्यापक वृंद उपस्थित होते.