अमळनेर:- केंद्र शासनाच्या सहकार्याने पर्यावरण पुरक बांबू लागवड, प्रशिक्षण, आणि स्वयम रोजगारच्या माध्यमातून जळगाव सारख्या जिल्हातील कृषी प्रधान जिल्ह्यातील महिलाना स्वयं रोजगार उपलब्ध करून आर्थिक सक्षमतेकडे नेण्याचा मानस मानिनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांनी बोलुन दाखवला.
श्री मंगळ ग्रह सेवा संस्थांन येथील सभागृहात आयोजित केलेल्या मानिनी संवाद या कार्यक्रमात बोलताना डॉ. भारती चव्हाण यांनी प्रतिपादन केले. देशातील कृषी क्षेत्रामध्ये सुमारे ८० टक्के महिलांचा सहभाग असतानाही शेतकरी महिलांचे संघटन, प्रशिक्षण, शेती प्रक्रिया उद्योगातील सहभाग आणि अर्थ व्यवस्थेतील पकड़ किवां विपणन व्यवस्थेतील निर्णय क्षमतेचा अभाव आणि शेती अर्थ व्यवस्थेतील सहभाग या गोष्टीचा अभाव जाणवतो. किंबहुना महिला सक्षमीकरण व सबलीकरणासाठी शेती व शेती प्रक्रिया उद्योग यावर लक्ष केन्द्रित करणे आवश्यक आहे. राज्यशासन व केंद्र शासनाच्या शेती पुरस्कृत योजनाच्या आणि धोरणाच्या आधारे स्वयं रोजगार निर्मिती करणे शक्य आहे. जळगाव जिल्ह्यातील जमिनीची सुपीकता, पाण्याची उपलब्धता आणि महिलांची शेती विषयक पारंपरीक् आवड आणि अनुभव लक्षात घेता मानिनी फाऊंडेशनच्या माध्यमातून पर्यावरण पुरक शेती म्हणून् बांबू लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात् येत आहे, यामधे विशिष्ट प्रकारच्या जातीच्या बांबू च्या रोपांची उपलब्धता करुन देणे, लागवडीविषयक प्रशिक्षण देणे,लागवडीसाठी शासनाच्या अतंर्गत आर्थीक मदत मिळवुन देणे, तयार झालेल्या बांबू च्या खरेदीची हमी देणे, बांबू पासुन तयार होणाऱ्या उत्पादनाचे प्रशिक्षण देणे आणि हाताने व मशीनचे माध्यमातून विविध वस्तू तयार करूंन महिलाना रोजगार निर्मिती देणे आणि त्यांची विविध प्रकारे मार्केटिंगची व्यवस्था करणे याकामी फौंडेशनच्या माध्यमातून सहकार्य करणार असल्याचें डॉ. भारती चव्हाण यांनी सांगितले.
सदर् उपक्रमासाठी आणि महिलांचे विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी श्री मंगल ग्रह् संस्थाचे सचिव बाविस्कर यांनी जाहीर केले. बांबू प्रशिक्षण आणि कार्य शाळेबाबतची माहिती उमेश सोनार आणि संदिप माळी यांनी उपस्थित महिलाना दिली. सदर मेळाव्यास सुमारे ५०० महिला शेतकरी उपस्थित होत्या. सदर मेळाव्यास राज्य पदाधिकारी आणि कौटुंबिक न्यायालयातील ज्येष्ठ कायदे तज्ञ पुनम तांबट, कृषिभुषण सतीश काटे, संस्थानचे दिलीप बेहरम, शरद कुलकर्णी, महेश पाटील, दिनेश पाटिल, संजय पाटील, अतुल पाटील,तसेच जळगावच्या अध्यक्षा जयश्री इंगळे,कार्याध्यक्ष भारती पाटील, छाया पाटील, कल्पना पाटील, आदि मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन महेश पाटील, प्रस्ताविक अतुल पाटील आणि आभार प्रदर्शन डॉ दिनेश पाटील यांनी केले.