प्रगती सेना गटाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांचा दावा…
अमळनेर:- बहुचर्चित ग. स. सोसायटी येथे प्रगती शिक्षक सेना व लोकसहकार गटाचीच सत्ता येणार असल्याचा दावा प्रगती सेना गटाचे अध्यक्ष रावसाहेब मांगो पाटील यांनी केला आहे.
“प्रगती सेना गटाचे सर्व संचालक गोव्यात साथ साथ आहेत. सोबत लोकसहकार गटातील सहाही संचालक सोबत आहेत. एकही संचालक इतर कोणत्याही गटासोबत नाही. तसेच सहकार गटातील ५ संचालक ही संपर्कात आहेत. इतर वृत्तपत्रात आलेल्या बातमीमध्ये तथ्य नसून सत्ता ही प्रगती सेना व लोकसहकार गटाची स्थापन होईल. तसेच शिक्षक अध्यक्ष झाला पाहिजे ही सभासदांच्या मनातील इच्छा ही श्री संत गजानन महाराजांच्या आशिर्वादाने १२ तारखेला गुरूवारी पूर्ण होईल” असा विश्वास रावसाहेब पाटील यांनी व्यक्त केला आहे.