अमळनेर काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी…
अमळनेर:- येथील अमळनेर नरडाणा राज्यमार्गावर गतिरोधक व सूचना फलक लावावे अशी मागणी काँग्रेस कमिटीकडून करण्यात आली आहे.
अमळनेर नरडाणा मार्गावर रहदारी मोठ्या प्रमाणावर वाढली असून दररोज छोटे मोठे अपघात होत आहेत. तसेच काही प्रवाशांचा मागील काळात अपघातात मृत्यू ही झाला आहे. सदरचा राज्यमार्ग हा शहरी वस्तीतून जात असल्याने त्या मार्गावर गतिरोधक व सूचना फलक लावल्यास अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. दाजीबा नगर, गलवाडे नाका, श्रद्धा नगर, ग्लोबल शाळेजवळ, अजय केले यांच्या घराजवळ या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी केली असून अश्या सूचना कंत्राटदार बी.आर. भदाने यांना पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात याव्यात अशी विनंती केली आहे. सदर निवेदन पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना देतेवेळी काँग्रेसचे पदाधिकारी मनोज पाटील, महेश पाटील, तोसिफ तेली, साबीर बागवान, कुणाल चौधरी आदी उपस्थित होते.