
बेपत्ता झाल्याची तक्रार मारवड पोलीसात दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील डांगरी येथील १९ वर्षीय तरुणी संतापाच्या भरात घरातून निघून गेल्याने बेपत्ता झाल्याची तक्रार पालकांनी नोंदविली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. १२ मे रोजी सकाळी ११ वाजता सदर तरुणीने तिच्या आईला शेजारणी सोबत अमळनेर येथे दवाखान्यात जावून येते असे सांगितले. मात्र तिच्या आईने उन्हाळा सुरू असून बाहेर जावू नको असे सांगितल्याने त्या दोघात किरकोळ वाद झाला. त्यानंतर सदर मुलीने कपडे पिशवीत भरले आणि मी तुमच्या घरात पाय ठेवणार नाही असे सांगत घरातून निघाली. तिच्या आईने आपल्या जावयाला तीला घेवून येण्यास पाठवले असता सदर तरुणीने त्यांच्याशी ही वाद घालत अमळनेर कडे रिक्षात बसून निघून गेली. मात्र त्यानंतर तिचा अमळनेर व परिसरात शोध घेतला असता ती मिळून आली नाही. त्यामुळे आशाबाई कोळी यांच्या फिर्यादीनुसार मारवड पोलीसात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. पुढील तपास स. फौ. बाळकृष्ण शिंदे हे करीत आहेत.







