
पायोनियर कंपनीतर्फे करण्यात आले होते मेळाव्याचे आयोजन…
अमळनेर:- पायोनियर संकरीत मका P३३०२ तर्फे भव्य शेतकरी मेळाव्यचे आयोजन दि. १२ मे २०२२ रोजी अमळनेर येथील श्रीमती इंदीरा गांधी विद्यालयातील प्रांगणात करण्यात आले होते.
सदर मेळाव्यात अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगांव, एरंडोल येथील प्रगतशील शेतकऱ्यांनी आवर्जून उपस्थीती लावली. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी, वक्ता, हवामान शास्त्रज्ञ डॉ. पंजाबराव डख (पाटील) यांनी सर्व शेतकऱ्यांना मका पिकाच्या वानाविषयी व हवामान अंदाजाबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. पंजाबराव डंख (पाटील)यानी सर्व शेतकऱ्यांना येणाऱ्या खरीफ हंगामा करीता पायोनीअर कंपनीचे प्रचलीत P3302 हे वाण कसे फायदेशीर होऊ शकते त्या बद्दल मार्गदर्शन केले. कमी कालावधीत परिपक्वता, अतीशय मजबूत मुळे, विपरीत परिस्थीतीशी लढण्याची क्षमता, व कैप्सुल दाणा अशी या वाणाची वैशिष्ठे नमूद केली. पंजाबराव डख पाटील साहेबांच्या हस्ते मागील खरीप 2021 हंगामातील मका वाण P3302 चे सरासरी एकरी 30ते 35 क्विंटल उत्पादन घेणाऱ्या पंचकृषीतील 18 @८ शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी अमळनेर ,पारोळा, धरणगाव, चोपडा,एरंडोल ५० पेक्षा अधिक गावातील ११०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी तसेच परिसरातील वितरक व विक्रेत्या बंधूनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद तराळ यांनी अध्यक्षीय भाषण करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला कृषी अधिकारी भरत वारे,अमळनेर तालुक्यातील प्रमुख कृषी विक्रेते, संघटनेचे अध्यक्ष योगेश पवार तसेच पायोनिअर सिडसचे वितरक किरण अग्रो एजेंसी व विजय एजन्सीचे संचालक यांनी सहकार्य केले. सदरील कार्यक्रमाला पायोनियर सिडस् कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक विवेक राठोड (पाचोरा) व प्रमोद जाधव (जामनेर), कंपनी कर्मचारी लखनसींग पाटील, शंकर चौधरी, विकास कोळपे, नरेंद्रसींग पाटील, प्रमोद कोळी, गुलाब पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पाटील यांनी तर पायोनिअर सीडसचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्री मंदार निगडे यांनी आभार प्रदर्शन केले. व शेतक-यांना येणाऱ्या खरीप हंगामाच्या शुभेच्छा दिल्या.







