
वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी…
अमळनेर :- शहरातील पालिकेच्या राजश्री शाहू चौकातील हायमॉस्ट व सीसीटीव्ही असलेल्या विजेच्या खांबाला अज्ञात वाहनाने दिला धक्का धक्का दिल्याने सीसीटीव्ही वर आता हा महाशय कोण होता हे उघड होईल.
वर्दळीमुळे या धक्का दिलेल्या वाहनाने प्रश्नचिन्ह उभे केले आहे. सदर वाहनधारक शोधून पालिकेमार्फत या वाहनाचा तपास करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या रस्त्यावर जिनिंगच्या ट्रक व वाळूचे ट्रक सुसाट धावतात. या भागातील नगरसेवक यांनी सदर खांबाला सिमेंट पाईप बसविलेल्या खांबाचा सिमेंट पाईपच वाकवून टाकल्याने खळबळ उडाली आहे. समजा योगायोगाने हा खांब कोसळला असता तर यावरील हायमॉस्ट व डीवायएसपी राकेश जाधव यांनी मेहनतीने बसविलेल्या सीसीटीव्ही यंत्रणा बाराच्या भावात गेली असती याबाबत पालिका व पोलीस विभागाने सदर वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे.







