
अमळनेर:- येथील बि-हाडे कुटुंबातील जिज्ञासू तरूण कोरोनाच्या महासंकटाने त्याला मागच्या वर्षी हिरावले. त्या कर्मरत,मेहनती तरूणाचा स्मृतीशेष कार्यक्रम मोठ्या संख्येने सहृदय अंतकरणाने, भावुक, साश्रूनयनांनी मान्यवरांच्या विचार मंथनाने पार पडला. बुद्धवंदना व प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. नंतर कुणालच्या आठवणींना उजाळा देणारा ” स्मृतीविशेषांक” प्रकाशित करून त्याचे ऑनलाईन व ऑफलाईन उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. एल. ए. पाटील माजी प्राचार्य प्रताप कॉलेज अमळनेर, डॉ. राहुल निकम समाजकार्य महाविद्यालय चोपडा, प्रा. अशोक पवार सामाजिक कार्यकर्ते, सुदाम महाजन तहसीलदार, एस. टी .माळी माजी उपजिल्हाधिकारी, सि.के अण्णा पाटील चेअरमन शैक्षणिक संस्था, प्रा.उल्हास मोरे, विनोद मोरे, श्याम अहिरे माजी सभापती यासह उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
प्रा.अशोक पवार सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत कुणालच्या परिवाराबद्दल भूमिका विशद केली. कुणालच्या काही मित्रांनी मनोगते व्यक्त केली. प्रमुख वक्ते डॉ.प्रा.राहुल निकम सर यांनी बुध्दाच्या विचाराने दु:खाचे निवारण होते यासह अनेक मुद्दे मांडले. डॉ. एल. ए. पाटील यांनी कुणाल सहृदयी मित्र, खडतर मेहनती, विवेकी, प्रगल्भ विचाराचा विद्यार्थी, सुधारक प्रकृतीचा जिज्ञासू असे त्याचे विविध पैलू सांगत आम्ही एका संशोधकाला मुकलो असे डॉ.एल ए पाटील सरांनी प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुदाम महाजन यांनीही मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजीत शिंदे सर यांनी केले. शेवटी बौध्दाचार्य सिद्धार्थ सोनवणे यांनी सरणंत्तय म्हटले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गौतम मोरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी असंख्य आप्तजन, मित्रपरिवार, नातलग, स्नेहीजन, शिक्षक माता भगिनी उपस्थित होत्या. शेवटी खीरदान वाटप करून कार्यक्रमाचा समारोप झाला. सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब संदानशिव, इंजि.विनोद मोरे, प्रा. उल्हास मोरे, ह्रदनाथ मोरे, सत्यजित बि-हाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.







