
३००० बैलजोडी धारक शेतकऱ्यांना पोळा निमित्त बैल साज वाटप, मापाडींना स्वतंत्र लॉकर सुविधा उपलब्ध करून देणारी राज्यातील पहिली बाजार समिती
अमळनेर:- येथील अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने माजी मंत्री आ.अनिल भाईदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित समारंभात भर पावसात हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बैलजोडी धारक शेतकऱ्यांना पोळा सणाचा बैल साज , मापडींना लॉकर किल्लीचे वाटप आ.अनिल पाटील, खा.स्मिता वाघ यांच्या हस्ते करण्यात आले तर आ.पाटील शैक्षणिक साहित्य तुला करण्यात आली.
आ.अनिल पाटील यांनी सांगितले की मतदारसंघ बागाईत होत नाही तोपर्यंत मी शेतकऱ्याची साथ सोडणार नाही पुढील काळात पं.स, जि.प, न.प आमच्या ताब्यात द्या शेवटच्या घटकापर्यंत सर्व योजना पोहचवून विकास करून दाखवू . शेतकऱ्यांनी पोळा सण पारंपरिक पद्धतीने जरूर साजरा करावा पण शेतकरी आधुनिकतेकडे जावा कृषिसाक्षर व्हावा असे कार्यक्रम येणाऱ्या काळात बाजार समितीने राबवावे असेही आवाहन यावेळी सत्काराला उत्तर देताना आ.पाटील यांनी केले.
आ.अनिल पाटील व सौ.जयश्री पाटील यांची फटाक्यांच्या आतिषबाजीत व ढोलताशांच्या गजरात सपत्नीक मिरवणूक सजविलेल्या बग्गीवरून काढण्यात आली. आ.अनिल पाटील यांची शैक्षणिक साहित्य तुला करण्यात आली.सभापती अशोक पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले की, शैक्षणिक साहित्याचे वाटप तालुक्यातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत जाऊन करण्यात येईल तर आ.अनिल पाटील बाजार समितीसाठी नेहमीच लकी ठरलेले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली बाजार समिती कर्जमुक्त होऊन ५ कोटी शिलकी राहिलीआहे.विविध विकास कामे होताना यंदा समिती जिल्ह्यात क्रमांक १ व विभागात क्रमांक ३ झाली आहे. शेतकरी निवास मंजूर झाले असून शेतकऱ्यांना स्वस्त चविष्ट भोजन लवकरच उपलब्ध करून देऊ.एकमताने काम करणाऱ्या सर्व संचालकांसोबत काम करण्याचे भाग्य लाभल्याचे सांगत आ.अनिल पाटील यांनी पुन्हा मंत्री व्हावे अशा शुभेच्छा यावेळी सभापती अशोक पाटील यांनी दिल्यात.
याप्रसंगी सभापती अशोक पाटील, उपसभापती सुरेश पाटील व संचालक मंडळ,कर्मचारी वृंद यांचेकडून आ.अनिल पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अमळनेर अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे यांनी केले. आभार उपसभापती सुरेश पाटील यांनी मानले.
तालुक्यातील ३००० बैलजोडी धारक शेतकऱ्यांना पोळा निमित्त बैल साज वाटप…
यावेळी मंचावर बैल जोडीधारक शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात शेतकरी सभासदांना पोळा सणासाठी बैलांचा साज वाटप शुभारंभ करण्यात आला. यात बैलजोडीसाठी आवश्यक विविध वस्तू,सजावट साहित्याची बॅग ३००० शेतकऱ्यांपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांमार्फत घरपोच पोचविण्यात येणार आहे.
कष्टकरी मापाडींना स्वतंत्र लॉकर सुविधा उपलब्ध करून देणारी राज्यातील पहिली बाजार समिती
कृषी उत्पन्न बाजार समिती येथील शेकडो मापाडी काम करतात.अशा कामगारांसाठी आपले साहित्य,डबा व महत्वपूर्ण वस्तू ठेवण्यासाठी लॉकर उपलब्ध करून देण्यात आले असून मापाडी यांना वैयक्तिक लॉकरच्या किल्ल्या वाटप याप्रसंगी खा.स्मिता वाघ ,मा.जि प सदस्या सौ.जयश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आल्यात.
नवनिर्वाचित विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाचे सत्कार यावेळी करण्यात आले.यावेळी मंचावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ.अनिल शिंदे, डॉ.अशोक पाटील,भोजमल पाटील, समाधान धनगर, हिरालाल पाटील,प्रफुल्ल पाटील,सौ.सुषमा पाटील,सौ.पुष्पा पाटील,भाईदास भिल ,नितीन पाटील, प्रकाश वाणी,ऋषभ पारख,शरद पाटील, माजी जिल्हा बँक संचालिका सौ. तिलोत्तमा पाटील,सौ.रिता बाविस्कर,माजी संचालक अनिल शिसोदे, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष भागवत पाटील,मुख्तार खाटिक ,जळगाव जि.गटसचिव पतसंस्थेचे चेअरमन विजय पाटील, शिवाजीराव पाटील,प्रा.सुरेश पाटील,डॉ.रामराव पाटील, गणेश भामरे,शितल देशमुख,हेमंत पवार ,प्रसन्ना जैन आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ.उमेश राठोड यांच्यासह कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी आलेल्या प्रचंड संख्येने उपस्थित शेतकऱ्यांमुळे अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवार फुलले होते.

