
अमळनेर:- गोल्ड व्हॅल्यूवर असोसिएशनचे सभासदत्व घेण्याचे आवाहन संघटनेचे संघटक भैया भामरे यांनी केले आहे.
गोल्ड व्हॅल्यूवर असोसिएशन महाराष्ट्र राज्यचे कार्य संपूर्ण महाराष्ट्र भर सुरू झाले असून आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास 400 मेंबर्स झाले आहे. गोल्ड व्हॅल्यूवर असोसिएशनच्या प्रत्येक सभासदाला आयकार्ड व प्रमाणपत्र देण्यात येत आहे. महाराष्ट्रमधे गोल्ड व्हॅल्यूवर असोसिएशनचे 100 हुन अधिक अधिकृत पदाधिकारी काम करत आहेत. सभासदत्वची प्रकिया पुर्ण झाल्यावर अधिकृत सभासदांसाठी चर्चा सत्र व कार्यशाळा आयोजित करण्याचा असोसिएशनचा मानस आहे. तरी ज्या गोल्ड व्हॅल्यूवर ने अजून पर्यंत असोसिएशन चे सभासदत्व घेतले नसतील त्यांनी असोसिएशन सभासदत्व लवकरात लवकर घ्यावे असे आवाहन गोल्ड व्हॅल्यूवर असोसिएशन महाराष्ट्र राज्य संघटक भैय्या भामरे यांनी केले आहे.







