तरवाडे ते शिरसाळे दरम्यान अपघात, पोलीसात तक्रार दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील तरवाडे ते शिरसाळे दरम्यान भरधाव दुचाकी स्वाराने मोटारसायकलीला धडक दिल्याने चार जण जखमी झाले असून मारवड पोलीसात दुचाकी स्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दादाभाई पाटील हे आपली पत्नी वैशाली, मुलगा कल्पेश (वय ८) व मुलगी शिवण्या (वय ४) यांच्या समवेत मोटारसायकलने ३ मे रोजी अमळनेर कडे जात असताना तरवाडे ते शिरसाळे दरम्यान समोरून येणाऱ्या मोटारसायकल क्रमांक एमएच १९ डीएन ९०८९ वरील चालकाने अतिवेगाने समोरून धडक दिल्याने चारही जण रस्त्याच्या खाली फेकले गेले. दादाभाई पाटील यांच्या पायाला दुखापत होवून हाड मोडले तसेच वैशाली यांना मुकामार, कल्पेश याला पायाला टाके व मुलीला पायाला व चेहऱ्याला खरचटले. दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर वैशाली पाटील यांनी फिर्याद दिली असून सदर दुचाकीस्वाराविरोधात मारवड पोलीसात २७९,३३७, ३३८, मोव्ही ॲक्ट १८४ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो ना भरत गायकवाड करीत आहे.