
अमळनेर:- शहरातील चिकाटे गल्लीत लावलेली मोटारसायकल भरदुपारी चोरून नेणाऱ्या मोटारसायकल चोराला अमळनेर पोलिसांनी अवघ्या बारा तासात ताब्यात घेतले आहे.
22 रोजी दुपारी 01.00 ते 02.30 वाजेच्या सद्दाम हुसेन राहणार चिकाटे गल्ली अमळनेर यांचा राहत्या घराच्या समोर त्यांची काळ्या रंगाची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक MH 19 AS 3590 ही लावलेली असताना ती कोणीतरी चोरट्याने चोरून नेल्याबाबतची तक्रार पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना प्राप्त झाली. दत्तात्रय निकम यांनी गुन्हा रजिस्टरी नोंदवून पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, पोलीस कॉन्स्टेबल निलेश मोरे, विनोद संदानशिव, उदय बोरसे अशांचे पथक तयार करून त्यांना सदर मोटरसायकल व तिला चोरणारा चोरट्याचा शोध घेण्याबाबत आदेश व सूचना दिल्या. पथकातील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार यांनी तात्काळ सदर मोटरसायकलचे मालक यांच्याशी संपर्क करून सदर मोटरसायकल चोरी झालेल्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले. त्यावरून तपासाची चक्रे फिरवून पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे तात्काळ धुळे शहराच्या दिशेने रवाना झाले. धुळे शहरातील पांझरा नदीच्या काठी अंजन शाह बाबा दर्गा जवळ सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी हा रात्री उशिरा पर्यंत त्याच्या मित्रांसोबत बसलेला असताना त्यास पथकातील पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. नंतर त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अर्शद अकबर शहा (वय 19 वर्ष राहणार 80 फुटी रोड भोला बाजार, धुळे) असे सांगितले. आणलेल्या संशयित आरोपीतास अटक करून दोन दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली. पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असताना त्यांच्याकडून सदर गुन्ह्यातील चोरी केलेली मोटरसायकल लपवलेल्या ठिकाणावरून हस्तगत करून जप्त करण्यात आलेली आहे. अमळनेर पोलिसांनी केलेल्या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

