
अमळनेर – तालुक्यातील मांडळ येथे जागतिक आदिवासी दिनी बिरसा मुंडा जयंती निमित्त मांडळ ग्रामपंचायत प्रतिमेचे पूजन सरपंच पती दीपक बडगुजर उर्फ भूरा भाऊ यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दीपक पाटील (माजी सभापती पंचायत समिती) यांनी केले. यावेळी त्यांनी सांगितले की, इंग्रजांनी बिरसा मुंडा यांच्यावर व आदिवासी समाजावर खूप अन्याय अत्याचार केला. त्यांना धर्मांतर करण्यापासून तर सर्व प्रकारच्या शिक्षा त्यांना भोगावे लागल्या. पण त्यांनी देशाप्रती आपले प्रेम थोडेसे ही न डगमगू देता शेवटपर्यंत इंग्रजांचा संघर्ष केला व भारतीय आदिवासी समाजाचं नाव लौकिक केले. यावेळी उपस्थित माजी सरपंच सुरेश कोळी, माजी उपसरपंच विजय शिरसाठ, ग्रामविकास अधिकारी प्रांजल वाघ, तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र धनगर, आदिवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब शिरसाठ, विकास बडगुजर, दादा पारधी, ग्रामपंचायत कर्मचारी अशोक कोळी, वाघ बापू, रोहित देसले उपस्थित होते. आभार ग्रामविकास अधिकारी प्रांजल वाघ यांनी मानले.

