
अमळनेर:- ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवड संचलित न्यू इंग्लिश स्कूल प्रगणे डांगरी येथे कै. एन.जी. पाटील (दादा) यांच्या स्मरणार्थ मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील चेअरमन ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवड यांनी भूषविले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून देविदास शामराव पाटील उपाध्यक्ष ग्राम विकास शिक्षण मंडळ, महारु रामदास शिसोदे, चंद्रकांत रामराव शिसोदे, अनिल शिसोदे, दिपाली उदय शिसोदे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने झाली .त्यानंतर इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर करून मान्यवरांचे स्वागत केले देविदास शामराव पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये एन.जी. दादा व सी.जी दादा यांच्या कार्याची माहिती दिली. तसेच डांगरी शाळेतील शिक्षकांबद्दल गौरव उद्गार करून शिक्षकांचा उत्साह द्विगुणित केला.डांगरी गावाच्या प्रथम नागरिक दिपाली उदय शिसोदे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात ग्रामविकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव मन्साराम पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थी व शिक्षक यांच्या पाठीमागे आम्ही सदैव आहोत व शाळेविषयी तळमळ व्यक्त केली. तसेच एन.जी दादांना आदर्श शिक्षक पुरस्कार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मिळाला याबद्दलची माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते इयत्ता पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन निलेश शर्मा यांनी केले. प्रस्तावना महेंद्र पाटील सरांनी केली. तसेच आभार प्रदर्शन सुरेश वाडीले सरांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक राकेश पवार सर,ज्येष्ठ शिक्षक पी. व्ही.साळुंखे,जे.एन. करंदीकर,श्रीमती प्रतिभा सोनवणे, प्रजय साळुंखे तसेच राजेंद्र शिंदे यांनी परिश्रम घेतले.

