
अमळनेर:- गुरे शेतात घुसून नुकसान करत आहेत, लक्ष ठेवता येत नाही का ? असे बोलण्याचा राग आल्याने निंभोरा येथील शेतकऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे.
निंभोरा येथील शेतकरी सुरेश मोरे (वय ७४) हे १५ रोजी शेतात असताना शेजारील शेत मालक यांच्या मालकीची बैलजोडी फिर्यादीच्या शेतात घुसून तुरीच्या पिकाचे नुकसान करू लागले. फिर्यादीने त्या बैलांना हाकलून शेजारील शेतकरी दिनेश हिरामण बागुल याला तुझ्या बैलावर लक्ष ठेवता येत नाही का ? अशी विचारणा केल्याचा राग येऊन दिनेश हा धक्काबुकी करू लागला. त्याच वेळी त्याची आई पमाबाई हिरामण बागुल ही आली व फिर्यादी सुरेश मोरे यांच्यावर विळ्याने वार वार केला. मात्र सुरेश यांनी तो वार चुकवला मात्र त्यांच्या डाव्या हाताला लागल्याने रक्तस्त्राव सुरू झाला. त्यामुळे ते दोघे तिथून निघून गेले.सुरेश मोरे यांनी वैद्यकीय उपचार घेऊन १८ रोजी दोघांविरुद्ध मारवड पोलिसांत तक्रार दाखल केली असून पुढील तपास हेकॉ संजय पाटील हे करीत आहेत.

