एलसीबी व मारवड पोलिसांची संयुक्त कारवाई…
अमळनेर:- तालुक्यातील शिरसाळे येथे गावठी दारू विक्रेत्यांवर तर मांडळ येथे देशी विदेशी दारू अवैध रित्या विकणाऱ्यावर एलसीबी व मारवड पोलिसांनी कारवाई केली आहे.
शिरसाळे येथे गावठी दारू विक्रेत्यावर कारवाई…
स्थानिक गुन्हे शाखेचे संदीप पाटील यांना पो. नि. किरणकुमार बकाले यांच्या आदेशानुसार त्यांनी मारवड पोलीस ठाण्याचे हे कॉ. फिरोज बागवान, हे कॉ. भरत इशी यांना सोबत घेत शिरसाळे येथे छापा टाकला असता धनराज अर्जुन पाटील हा गावठी दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून ९०० रुपये किमतीची ३० लिटर गावठी दारू मिळून आली आहे. नमुने घेवून उरलेल्या साहित्याचा जागीच नाश करण्यात आला असून सदर आरोपींविरुद्ध मारवड पोलीसात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ ई अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
मांडळ येथे देशी विदेशी दारू अवैधरित्या विकणाऱ्यावर कारवाई…
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.ना. प्रवीण मांडोळे यांना पो. नि. किरणकुमार बकाले यांनी दिलेल्या आदेशानुसार त्यांनी मारवड पोलीस ठाण्याचे पो.ना. भरत गायकवाड व पो. कॉ. गुलाब महाजन यांना सोबत घेत मांडळ येथे छापा टाकला असता जगदीश देविदास नेरकर हा अवैधरित्या देशी विदेशी दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून रू. ८२३०/- किमतीची देशी विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. पो.ना. प्रवीण मांडोळे यांच्या फिर्यादीनुसार सदर आरोपीविरुद्ध मारवड पोलीसात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ ई अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.