
आरोपी निशांतसिंग याने कोल्ड्रिंक्सच्या बाटलीत गोळ्या टाकून बेशुद्ध केल्याचा दिला जबाब
अमळनेर : धावत्या रेल्वेत गुंगीचे औषध दिलेले तिन्ही जण शुद्धीवर आले असून त्यांना आरोपी निशांतसिंग याने कोल्ड्रिंक्स च्या बाटलीत गोळ्या टाकून बेशुद्ध केले होते असा जबाब तिघांनी रेल्वे पोलिसांना दिला आहे.

गुरुचरणसिंग रा मोहाली पंजाब हे भरुचहुन खडकपूर जाण्यासाठी रेल्वेत बसले. ते दिव्यांग असल्याने त्यांना रेल्वे डब्यात बसताना आरोपी निशांतसिंग याने मदतही केली होती. त्याचवेळी त्याच डब्यात श्याम डांगील वय १६ , आणि बिंदेश्वर डांगील वय १७ रा झारखंड हे देखील भरुचहुन चक्रधरपूर जाण्यासाठी विकलांग डब्यात बसले. सुरुवातीला दोघा तरुणांना आरोपी निशांतसिंग याने कोल्ड्रिंक्स बळजबरीने पाजले. आणि विश्वास निर्माण होण्यासाठी त्याने गुरुचरण सिंग यांना देखील कोल्ड्रिंक्स पाजले. थोड्यावेळात तिघे बेशुद्ध झाल्यानन्तर त्याने तिन्ही बॅगा , रोख रक्कम १० हजार आणि सहा मोबाईल घेऊन पोबारा केला होता. तिघे जण अमळनेर रेल्वे स्टेशनपर्यंत तशाच स्थितीत आल्यानन्तर पोलीस उपनिरीक्षक मधुकर विसावे , हेमंत ठाकूर यांनी त्यांना तातडीने दवाखान्यात हजर केले. तिकडे पोलीस निरीक्षक बसंतराय व हेडकॉन्स्टेबल सुनीलकुमार यांनी आरोपीला शिताफीने पकडले होते.

