
अमळनेर : तालुक्यातील अंबारे येथील सी आय एस एफ चे जवान दशरथ शांताराम पाटील वय ३९ यांचा कर्तव्यावर हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना २३ रोजी सकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास वाशी येथे घडली.

दशरथ पाटील हे पुण्याला नोकरीला होते. कामानिमित्त ते वरिष्ठांबरोबर मुंबईला वाशी येथे गेले होते. त्यांच्या पश्चात मोठा भाऊ ,आई , पत्नी , मुलगी ,मुलगा असा परिवार आहे. ते प्रताप पाटील यांचे पुतणे आहेत.




