
अमळनेर : कोकणातील गणेशोत्सवासाठी अमळनेर आगाराच्या २८ बसेस रवाना करण्यात आल्या असल्याने लांब पल्ल्याच्या आणि मध्यम पल्ल्याच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाश्यानी सहकार्य करावे असे आवाहन आगार व्यवस्थापक प्रमोद चौधरी यांनी केले आहे.
सालाबादप्रमाणे कोकणच्या गणेशोत्सवासाठी अमळनेरहून बसेस रवाना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबई , पुणे , सुरत , अकोला ,नाशिक अशा लांब पल्याच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. त्याच प्रमाणे मध्यम पल्ल्याच्या देखील काही फेऱ्या बंद केल्या आहेत. त्यामुळे प्रवेश्यांची काही प्रमाणात गैरसोय होणार आहे. ग्रामीण भागातील देखील विद्यार्थी आणि नागरिकांच्या दृष्टीने शालेय व महाविद्यालयीन शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सर्व फेऱ्या सुरू राहतील मात्र काही अत्यावश्यक नसलेल्या ग्रामीण भागातील फेऱ्या देखील कमी होणार आहेत. जळगाव जिल्ह्यातून एरंडोल ,अमळनेर , चोपडा चाळीसगाव भागात बसेसची कमतरता असल्याने प्रवाश्यानी विनाकारण बाहेर पडू नये. २८ तारखेपर्यंत पाच दिवस बसेस गेल्याने तेव्हढे दिवस अत्यावश्यक नसेल तर प्रवास करू नये.
विद्यार्थ्यांनी बसस्टँडवर न रेंगाळता लवकर घरी जावे. आणखी बस येईल , मुक्कामाच्या गाडीने जाऊ म्हणून वाट पाहत बसू नये. पाच दिवस महामंडळाला सहकार्य करावे- प्रमोद चौधरी , आगार व्यवस्थापक अमळनेर

