
अमळनेर : मोटरसायकल स्लिप झाल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शिरूड ते कावपिंप्री गावादरम्यान घडली.
रामलाल सहादा बारेला व सीताराम सहादा बारेला हे दोघे भाऊ मोटरसायकल क्रमांक एम एच १९ इ के ५४५६ ने शिरूड येथून कावपिंप्रीला नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना ११ वाजेच्या सुमारास आबा महाजन यांच्या शेताजवळ मोटरसायकल स्लिप झाल्याने दोघे खाली पडले त्यात रामलाल याला डोक्यावर ,पाठीवर आणि कमरेला मार लागल्याने आजूबाजूच्या गावच्या लोकांच्या सहकार्याने त्याला उपचारासाठी धुळे येथे सरकारी रुग्णालयात दाखल केले. दुपारी २:५० वाजता उपचार घेताना त्याचा मृत्यू झाला. केशीराम सहादा बारेला याने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१ , १२५(अ), १२५ (ब), मोटर वाहन कायदा १८४ प्रमाणे रामलाल याच्या मृत्यूस व मोटरसायकलच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सीताराम बारेला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

