
लाभार्थी शेतकऱ्यांना खते, बियाणेसह विविध वस्तूंचे वाटप…
अमळनेर:- येथे मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते कृषि विभागाच्या विविध योजनांचा शुभारंभ करत लाभार्थी शेतकऱ्यांना विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले.
दिनांक ५ जुन २०२२ रोजी कृषि व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी अमळनेर तालुका दौऱ्यावेळी कृषि विभागाच्या विविध योजनाचा शुभारंभ केला. महाराष्ट्र शासन कृषी विभाग व राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बॅक (नाबार्ड) व राष्ट्रविकास अॅग्रो एज्युकेशन संस्था अमळनेर जळगाव संस्थेचे वतीने स्थापन केलेली माळण परिसर शेतकरी उत्पादक कंपनी रणाईचे ता. अमळनेर जि. जळगाव या शेतकरी कंपनी मार्फत बांधांवर खत १०:२६:२६ एफको ५ मे.टन व युरिया ५ मे.टन वितरण शुभारंभ दादाजी भुसे यांच्या शुभहस्ते करण्यात आला, तसेच कृषी विभागमार्फत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत तालुक्यातील ५ शेतकऱ्यांना प्रातीनिधिक स्वरूपात प्रमाणित तुर बियाणे मिनी कीट वाटप करण्यात आले.तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत सन 2021- 22 मध्ये कम्बाईन हार्वेस्टर संभाजी प्रताप पाटील रा.जानवे, यांना राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना व कृषी यांत्रिकीकरण उप अभियान अंतर्गत तालुक्यातील चार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व रोटावेटर यांचे अनुदानावर वितरण करण्यात आले. त्यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी अमळनेर, तालुका कृषी अधिकारी अमळनेर तसेच मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक तसेच कृषी विभागाचे सर्व अधिकारी शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष व सर्व संचालक मंडळ तसेच शेतकरी, कर्मचारी उपस्थित होते.







