प्रहारचे योगेश पवार यांचे जिल्हा परिषदेसमोर थाळी नाद आंदोलन…
अमळनेर:- तालुक्यातील दहिवद येथील तत्कालीन ग्राम विकास अधिकारी यांनी शासन नियमानुसार अपंगाना दिला जाणारा पाच टक्के निधीमध्ये अफरा तफर केली तसेच दिव्यांगांना मिळणाऱ्या सवलती न पासुन दिव्यांग बांधवांना वंचित ठेवले तसेच अपंग बांधवांना शासकिय स्तरावरून दिल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ दिला जावा असे निवेदन वारंवार देवून ही तत्कालीन ग्रामसेवक अधिकारी हे मनमानी कारभार करत आहे ह्या विषयी गटविकास अधिकारी यांच्या कडे तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवक संजीव सैदाणे यांची पाठराखण केली व कुठली ही ठोस कार्यवाही केली नाही म्हणून अखेरीस प्रहार अपंग क्रांती संघटना अमळनेर तालुका अध्यक्ष योगेश पवार, प्रहार संघटना जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, पाचोरा संगीता पाटील, प्रविण काटे, नुरखान पठाण, प्रदीप सोनवणे व प्रहार संघटनेचे पदाधिकारी व अपंग बांधव यांनी काल जिल्हा परिषदे समोर थाळी नाद आंदोलन केले. आता तरी प्रशासन जागे होइल का ? आम्हां अपंग बांधवांना वर होणाऱ्या अन्याला प्रशासन न्याय देईल का ? अशा हुकूमशाही ग्राम विकास अधिकारी यांना निलंबित करा, अशी आशयाची मागणी संघटनेने लावून धरली आहे. ह्या वेळी अमळनेर तालुक्यातील पदाधिकारी व अपंग बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी दी रा लोखंडे यांनी अमळनेरचे नवीन गटविकास अधिकारी यांना शिस्तभंगाची कारवाई करून जिल्हा परिषदेस अहवाल सादर करावा असे लेखी आश्वासन देवून आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती केल्याने आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले आहे.