अमळनेर:- तालुक्यातील बोहरा येथे पुरातन शिव मंदिराच्या जिर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू असून आज दिनांक ८ जून रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
बोहरा येथील मूळ निवासी व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेल्या श्रीमती सुनीता प्रकाश विंचूरकर यांनी आपले पती कै. प्रकाश हिम्मतराव विंचूरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आपल्या दातृत्वातून गावातील तापी नदीकाठी असलेल्या पुरातन शिव मंदिराचे जिर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन केले आहे. दि. १ जून पासून मंदिराची रंगरंगोटी, डागडुजी तसेच महादेवाच्या पिंडीची जिर्णोद्धार सोहळा व विविध पूजाअर्चा सुरू आहेत. काल ११ जोडप्याच्या हस्ते होम पूजन करण्यात आले. या कार्यक्रमात गावातील सर्व ग्रामस्थ हिरारीने सहभाग घेत आहेत. आज दिनांक ८ जून रोजी महादेवाच्या पिंडीला वज्रलेप लावण्यात येणार असून कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे. त्यामुळे आज सकाळी ११ वाजेपासून महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील सर्व भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमती विंचूरकर व बोहरावासियांनी केले आहे.