
आज रात्री नऊ वाजता होणार कार्यक्रम प्रसारित…
अमळनेर:- तालुक्यातील जळोद येथे जिल्हा परिषदेच्या शिक्षिका जयश्री पाटील ह्या आज कोण होणार करोडपती या कार्यक्रमात झळकणार आहेत.
आज दिनांक ८ जून रोजी रात्री नऊ वाजता सोनी मराठी वाहिनीवर हा कार्यक्रम प्रसारित होणार असून त्यांना २५ लाखाचा प्रश्न विचारला गेल्याचे कार्यक्रमाच्या टीझरमधून दिसत आहे. त्यामुळे त्या कुठवर मजल मारणार हे पाहणे औ्सुक्याचे ठरणार आहे. कार्यक्रमासाठी असलेले ७ टप्पे पार करत त्यांनी हॉट सीट पर्यंत जाण्याचा मान मिळवला असून त्यांच्या या यशामुळे तालुक्याचे नाव पुन्हा एकदा कोण होणार करोडपती या कार्यक्रमात झळकले आहे.

