पातोंडा व पंचक्रोशीतील गावांचे ग्रामदैवत म्हणून आहे नावलौकिक…
अमळनेर – तालुक्यातील पातोंडा येथील श्री माहिजी देवी देवस्थानला महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचा दि. 29 मार्च 2022 च्या शासन निर्णयानुसार ग्रामीण तिर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत ब वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा प्रदान करण्यात आला.
माहिजी देवी देवस्थानचा पातोंडा व पंचक्रोशीतील गावांचे ग्रामदैवत म्हणून नावलौकिक आहे. ग्रामीण तिर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत ब वर्ग दर्जा प्राप्त झाल्याने भगवती माहिजी देवीच्या भक्तांमधे आनंदाचे वातावरण आहे. दरवर्षी अश्विन नवरात्र, शाकंभरी नवरात्र व चैत्र नवरात्र उत्साहाने साजरी केली जाते. पौष शुध्द पौर्णिमेला पालखी नगरप्रदक्षणा व यात्रोत्सव साजरा करण्यात येतो. ऐन यात्रेच्या तोंडावर ब वर्ग दर्जा प्राप्त झाल्याने भाविकांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. माहिजी देवी देवस्थानला 2009 मधे तत्कालीन जि.प. अध्यक्षा स्मिताताई वाघ, माजी जि प सदस्य विनायक बिरारी , लेखाधिकारी अनिल भदाणे , ऋषी भदाणे यांच्या सहकार्याने क वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा प्रदान करण्यात आला होता. त्या अंतर्गत आजपावेतो संरक्षण भिंत , भक्त निवास , जि.प. सदस्या मिनाताई पाटील यांच्या निधीतून संपुर्ण परीसरात पेवर ब्लॉक बसविण्यात आले आहेत. पं.स. सदस्य निवृत्ती बागुल व प्रविण पाटील यांच्या निधीतून एल ई डी पथथिवे व काॅक्रीट गटार तर आमदार अनिल पाटील यांच्या निधीतून छोटेखानी सभामंडप व भाविकांच्या योगदानातून भव्य मंदिर सभामंडप निर्माण करण्यात आले आहे.
मंदिर देवस्थानास ब वर्ग दर्जा प्रदान करण्यासाठी आमदार अनिल पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी व स्मिताताई वाघ, उप सचिव मनोज जाधव , उपसंचालक नागपुर वि.प्र.प्रा. कपिल पवार , सामाजिक कार्यकर्ते किरण शिंदे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर बाविस्कर , सहाय्यक लेखाधिकारी अनिल भदाणे , सहाय्यक संशोधन अधिकारी अनिल सुर्यवंशी , सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक नरेंद्र पवार , कनिष्ठ सहाय्यक पी एस बडगूजर , पातोंडा ग्रामस्थ , भाविकांचे व शासनाचे अनमोल सहकार्य लाभल्याने देवस्थानचे अध्यक्ष योगेश पाटील यांनी आभार मानले.
प्रतिक्रिया –
” माहिजी देवी देवस्थानचा शासनाच्या ग्रामीण तिर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत ब वर्ग दर्जा प्रदान झाल्याने पातोंडा गावाचा पर्यटन क्षेत्र वाढीस लागणार असुन विकास कामांना गती मिळणार असल्याने देवस्थान विश्वस्त मंडळाचे विशेष योगदान आहे.” – अनिल पाटील, आमदार अमळनेर