ग्रुपमध्ये अमळनेरच्या साडे पाच वर्षीय तनिष गुरव याचाही समावेश…
अमळनेर:- बेळगाव येथे सलग ९६ तास स्केटिंग करून ४१ मुलांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवून आपले नाव उज्वल केले. यात अमळनेरचा साडे पाच वर्षीय तनिष गुरव याचाही समावेश आहे.
बेळगाव येथे पार पडलेल्या ९६ तास सलग रोलर स्केटिंग करण्याचा विक्रमामध्ये ४९६ खेळाडूंचा समावेश होता. हा कार्यक्रम २८-मे -२०२२ ते ०३-जून-२०२२ या काळात शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब यांच्या मार्फत घेण्यात आला. त्यात बदलापूरच्या सुरज स्केटिंग अकॅडेमिच्या ४१ मुलांनी आपले नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवले. या सर्व मुलांना प्रशिक्षण देणारे शिक्षक सौ. मनीषा कौशिक गरवालीया व सुरज गरवालीया यांनी दिले. यात अमळनेर तालुक्यातील आरटीओ इन्स्पेक्टर सुनील बाबुराव गुरव व दत्तात्रय बाबुराव गुरव यांचे नातू, कमलेश उर्फ बाळू गुरव यांचे पुतणे तर मिलिंद(नानू)गुरव यांचे चिरंजीव कु.तनिष मिलिंद गुरव सध्या बदलापूर येथे स्थायिक या साडेपाच वर्षीय चिमुरड्याने अमळनेर शहराचे नाव उंचीवर नेण्याचे काम केले आहे. विविध स्तरातील मान्यवरांनी या सर्व मुलांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.