सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या संख्येने घडवून आणले पुनर्विवाह…
सागर मोरे
अमळनेर:- तालुक्यातील मूळचे जानवे येथील सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी भास्कर पाटील यांनी खान्देश पुनर्विवाह ह्या सोशल मीडियाच्या गृप मार्फत महाराष्ट्र भर आजपर्यंत मोठ्या संख्येने पुनर्विवाह घडवून आणल्याने शिक्षक व सामाजिक मंडळीकडून अभिष्टचिंतन करण्यात आले.
आजच्या घडीला प्रत्येक समाजात विविध कारणावरून घटस्फोटाचे प्रमाण अधिक वाढलेले आहे. काही समाजात आजही पुनर्विवाह न करण्याच्या प्रथा आजही अंमलात आहेत. त्यामुळे घटस्फोटित तरुण तरुणींना आपले आयुष्य एकाकी जगावे लागत असते.या अप्रचलीत समाज रूढींना फाटा देण्याचे काम करत सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी भास्कर पाटील यांनी व्हाट्सअप या सोशल मीडिया ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यक्तींना एकत्र करत खान्देश पुनर्विवाह ग्रुपची स्थापना केली आणि त्या माध्यमातून त्यांनी खान्देशात अनेक समाजात घटस्फोटित तरुण-तरुणींचे पुनर्विवाह त्यांनी घडवून आणलेत. त्यांच्या ह्या कामाची दखल घेत त्यांना राज्य स्तरीय आदर्श समाज रत्न पुरस्कार, राज्य स्तरीय मानव विकास पुरस्कार, खान्देश प्रेरणा पुरस्कार असे अनेक विविध पुरस्कार डॉ तात्याराव लहाने सारख्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या हस्ते मिळालेले आहेत. त्यांचे पुनर्विवाहचे कार्यही आजही सुरू आहे. त्या निमित्ताने बिडगाव येथील शिक्षक के.बी पाटील, अमर संस्था येथील चव्हाण, कमळगाव हायस्कूलचे आर एम पाटील, गोवर्धन येथील सामाजिक कार्यकर्ते कैलास पाटील यांनी भास्कर पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट घेवून शाल, श्रीफळ व हारगुच्छ देवून सत्कार यथोचित सत्कार केला.