सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:- पातोंडा येथे शुक्रवार रोजी संध्याकाळच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे मुख्य बाजारपेठ परिसरातील विदुयत पोलवर बाभळाचे झाड पडल्याने विदुयत पोल वाकला होता त्यामुळे बाजारपेठ व मुस्लिम वस्ती परिसरात वीज पुरवठा खंडित झालेला होता. 48 तास नंतर सदर वीज पुरवठा सुरळीत झाला.
शुक्रवार रोजी विजेच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासोबत पहिल्याच पावसाचे दमदार आगमन झाले होते.ठिकठिकाणी अनेक झाडांच्या फांद्या पडल्या होत्या. बाजारपेठ परिसरात मेडिकल दुकानासमोरील पडीत जागेवरील भले मोठे बाभळाचे झाड उन्मळून विदुयत पोलवर जाऊन कोसळले. परिणामी विदुयत पोल वाकून विदुयत तारा लोंबकळत होत्या.व वाहतुकीचा रस्ता बंद झाला होता. त्या दिवसापासून बाजारपेठ परिसर व मुस्लिम वस्ती परिसर अंधारात होता. जेसीबीच्या साहाय्याने सदर पडलेले झाड व विदुयत पोल बाजूला सारण्यात आले त्यावेळी महावितरणचे कर्मचारी न आल्याने नागरिकांना रोष झाला. उन्हाची दाहकता व उष्णतेमुळे सदर परिसरातील नागरिकांनी दोन रात्री व दिवस अंधारात काढले. तसेच ग्राम पंचायतीचा पाण्याचा फिल्टर प्लांटही विजेअभावी बंद असल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी नव्हते व नागरीक पाण्यासाठी भटकंती करत होते. लहान बालके,वृद्ध महिला व नागरिकही वैतागले होते. सामाजिक कार्यकर्ते मच्छीन्द्र वाघ यांनी थेट महावितरण उपकेंद्र गाठून तात्काळ नवीन विदुयत पोल बसविण्याची मागणी उपअभियंता यांच्याकडे केली. व आक्रमक भूमिका मांडली.विदुयत पोल नसल्याने व कंत्राटदार त्वरित न आल्याने सदर कार्यवाहीस विलंब झाल्याचे उपअभियंता यांनी सांगितले.तेव्हा तात्काळ त्यांनी संध्याकाळ पर्यंत नवीन विदुयत पोल बसविण्याचे आश्वासन दिले. आणि तब्बल 48 तास उलटल्यानंतर काल संध्याकाळी उशिरापर्यंत महावितरण कर्मचाऱ्यांनी कंत्राटी मजुरांसह पावसाच्या रिमझिम सरीत नवीन विदुयत पोल बसवून सदर परिसरातील विदुयत पुरवठा सुरळीत केला.म्हणून स्थानिक नागरिकांनी सर्व महावितरण कर्मचाऱ्यांचे आभार मानले. यावेळी स्थानिक नागरिकांनी सहकार्य केले.