
आरपीएफ व आधार संस्थेने आधार देत त्यांच्या आजी आजोबांकडे सोडण्याचा घेतला निर्णय
अमळनेर : आईच्या जाचाला कंटाळून घरातून निघून आलेल्या बालकांना आरपीएफच्या मदतीने आधार संस्थेने आधार देत त्यांच्या आजी आजोबांकडे सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

मूळचे झारखंड येथील एक कुटुंब वापी येथील कंपनीत काम करणाऱ्या दाम्पत्याला १३ वर्षाची मुलगी आणि ७ वर्षाचा मुलगा आहे. आई दोन्ही मुलांना विनाकारण मारत होती म्हणून दोन्हीही मुले घरातून निघून गेले. रेल्वेने प्रवास करताना रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक के एल सिंग मिनार व शिरोमणी डांगे या महिला कॉन्स्टेबलला आढळून आली. त्यांनी मुलांना गोड बोलून आधार संस्थेशी संपर्क साधला. आधार संस्थेच्या क्षेत्र समन्वयक मोहिनी धनगर यांनी दोन्ही चिमुकल्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या मनातील भीती दूर करून त्यांच्याशी गोड बोलून संवाद साधला.
मुलांशी आणखी जवळीक साधून अधिक माहिती जाणून त्यांना जळगाव येथील बाल सुधार समितीशी चर्चा करून त्यांच्या मान्यतेने आई वडिलांकडे न देता आजी आजोबांकडे सोपवण्यात येणार आहे.

