
ग्रामपंचायत सदस्याला मारहाण झाल्याची तक्रार, दुसऱ्या गटातर्फे ही फिर्याद दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील मांजर्डी येथे नळाचा पाईप लिकेज होण्यावरून दोन गटात वाद होऊन परस्परविरोधात अमळनेर पोलिसांत तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

पहिल्या गटातर्फे दाखल तक्रारी नुसार फिर्यादी योगिता विनोद पाटील (वय ३७) ह्या ग्रामपंचायत सदस्या असून त्याच्या घरासमोर राहणारे सरलाबाई नामदेव बागुल ह्यांचा पाण्याचा पाईप लिकेज होत असल्याने त्या ग्रामपंचायत सदस्यांना उद्देशून शिवीगाळ करत होत्या. त्यांना समजवायला फिर्यादी महिला गेली असता त्याचा राग येऊन सरला नामदेव बागुल, नामदेव दौलत बागुल, राज नामदेव बागुल, सुरेखा खंडू शेवाळे, गणेश खंडू शेवाळे ह्यांनी सदर महिलेला, तिच्या पती आणि मुलाला अश्लील शिवीगाळ करत चापटबुक्क्यांनी मारहाण केली. व हातातील पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी हिसकावून घेतली. व यांचा काटा काढून टाकू असे म्हणत धमकी दिल्याने सदर महिलेने अमळनेर पोलिसांत फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोउनि भगवान शिरसाठ हे करीत आहेत.
दुसऱ्या गटातर्फे दाखल फिर्यादीनुसार, फिर्यादी सरलाबाई नामदेव बागुल (वय ४०) ह्यांचा नळाचा पाईप लिकेज होत असल्याने त्याचा मुलगा राज हा मोठमोठ्याने बोलत असल्याने समोर राहणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य योगिता विनोद पाटील हिला वाटले की हा आपल्यालाच बोलत आहे. त्यावरून योगिता पाटील त्यांचे पती विनोद भागवत पाटील यांच्यासह भूषण विनोद पाटील, योगेश विनोद पाटील यांनी महिलेला चापट बुक्क्यांनी मारहाण करत अश्लील व जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच फिर्यादीचा पती व मुलाला मारहाण करत घर खाली करण्याची धमकी दिली व महिलेच्या गळ्यातले तीन ग्रॅमची सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. त्यावरून अमळनेर पोलिसांत जबरी चोरी, व एट्रोसिटीसह अन्य कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते हे करीत आहेत.

