
जितेंद्र ठाकूर, स्वप्ना विक्रांत पाटील व प्रताप शिंपी यांना नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद…
अमळनेर:- आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २९ रोजी तालुका व शहर विकास आघाडीने प्रभाग क्रमांक १७ मध्ये काढलेल्या प्रचार रॅलीला प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रॅलीच्या सुरुवातीपासून अखेरपर्यंत परिसरात उत्साह, घोषणा आणि नागरिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.

रॅलीचे नेतृत्व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र ठाकूर, तसेच प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार प्रताप शिंपी आणि स्वप्ना विक्रांत पाटील यांनी केले. उमेदवारांचे स्वागत ढोल ताशांच्या नादात, फुलांच्या उधळणीने आणि घोषणाबाजीच्या गजरात करण्यात आले. रॅलीचा संपूर्ण मार्ग समर्थकांनी भरून गेला होता.
माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती…
या रॅलीत माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी नागरिकांशी संवाद साधत सध्याच्या विकासकामांबाबत तसेच भावी योजनांबाबत सांगत भरघोस मतांनी सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. त्यांच्या सहभागामुळे समर्थकांमध्ये अतिरिक्त जोश पाहायला मिळाला.
महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग…
रॅलीमध्ये महिलांचा, युवकांचा तसेच आबालवृद्धांचा जोमदार सहभाग दिसून आला. अनेकांनी हातात झेंडे, बॅनर घेत उमेदवारांना पाठिंबा दर्शवला. नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत करत उत्साहाने सहभाग नोंदवला. रॅलीदरम्यान तीनही उमेदवारांनी नागरिकांचे आभार मानले. प्रभागाच्या प्रलंबित समस्या सोडवणे, मूलभूत सुविधा उन्नत करणे, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते-विकास, महिलांसाठी आणि युवकांसाठी नवीन उपक्रम राबवण्याबाबत आश्वासने देत त्यांनी विकासाला गती देण्याचा संकल्प व्यक्त केला. नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे शहर विकास आघाडीच्या शक्तीप्रदर्शनाची स्पष्ट झलक दिसून आली.

