
अमळनेर -अमळनेर पालिकेत लोकनियुक्त नगराध्यक्षपद व नगरसेवकाच्या ३६ जागा आहेत. यापैकी प्रभाग क्रमांक ८ अ ची एक जागा बिनविरोध झाली असून प्रभाग क्रमांक १ अ ची निवडणूक पुढे लोटली गेली आहे. त्यामुळे २ डिसेंबरला नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या उर्वरित ३५ जागांसाठी मतदान झाले.


आता प्रभाग क्रमांक १अ या जागेसाठी २० डिसेंबरला मतदान होणार आहे. बुधवार रोजी दुपारी ३ वाजेनंतर माघारीची मुदत संपल्यानंतर ३ उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक १ अ च्या उमेदवारांची अंतिम यादी ११ डिसेंबर प्रसिद्ध करण्यात येईल. व २० डिसेंबर सकाळी ७.३० ते ५.३० वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल.२१ डिसेंबर सकाळी १० वाजेपासून मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. नगरसेवकांच्या३४ जागा व नगराध्यक्ष पदासाठी मतदान झाले असले तरी शहरात अद्याप आचारसंहिता कायम आहे. २१ डिसेंबर रोजी निकाल लागल्यानंतर आचारसंहिता शिथिल होईल. असे निवडणूक निर्णय अधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी सांगितले.

