
अमळनेर : तालुक्यातील मांडळ येथील कट्टा लावून महसूल पथकाला धमकावून वाहने पळवण्याच्या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे.


उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे आणि डीवायएसपी विनायक कोते यांच्या सूचनेनुसार मारवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीभाऊ पाटील हे स्वतः पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार ,एएसआय फिरोज बागवान , हेडकॉन्स्टेबल संजय पाटील , मुकेश साळुंखे , प्रवीण पाटील , मिलिंद बोरसे , सुनील आगवणे , हेमचंद्र साबे , विनोद साळी , अमळनेर पोलीस स्टेशनचे मिलिंद सोनार , प्रशांत पाटील ,विनोद संदानशिव , उज्वलकुमार म्हस्के , उज्वल पाटील आणि आरसिपी प्लाटून चे ११ कर्मचारी , महिला कर्मचारी यांनी १० रोजी पहाटे आकाश उर्फ पप्पू जितेंद्र कोळी (वय १८) ऋषीकेष उर्फ दादू राजेंद्र कोळी(वय २३)सुमित महेंद्र कोळी (वय १८) सर्व रा. मांडळ याना ताब्यात घेतले.
दरम्यान अवैध वाळू वाहतूक करताना गावठी कट्टा लावून जेसीबी पळवण्यात आले होते. एपीआय जीभाऊ पाटील , फिरोज बागवान आणि संजय पाटील यांनी धुळे जिल्ह्यातील कंचनपूर येथून ते जेसीबी जप्त केले आहे.

