
अमळनेर – तालुक्यातील अमळगाव येथे मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले असून विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभागासाठी ओळखले जाणारे शिरपूर येथे कार्यरत पोलिस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे यांनी आपल्या वडील कै. भिमराव पांचाळ यांच्या १३व्या पुण्यस्मरणार्थ समाजोपयोगी कार्याची परंपरा पुढे नेत यंदा आरोग्यसेवेचा अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम राबविला आहे.


स्वतः गरीबीची परिस्थिती जवळून अनुभवल्यामुळे आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही गरिबाचे आरोग्य बिघडू नये, या संवेदनशील भूमिकेतून त्यांनी हे मोफत शिबिर आयोजित केले आहे. हे शिबिर शंकरा आय हॉस्पिटल, आनंद (गुजरात) आणि वैष्णवी ऑप्टिकल्स, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असून अमळगाव व पंचक्रोशीतील सर्व नागरिकांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे.
शिबिराचे वेळापत्रक — दिनांक : 17 डिसेंबर 2025 (बुधवार), वेळ : सकाळी 9.30 ते दुपारी 3.00, स्थळ : आदर्श माध्यमिक विद्यालय, अमळगाव, डोळ्यांची संपूर्ण तपासणी तसेच मोतीबिंदू ऑपरेशनसाठी पात्र रुग्णांना 19 डिसेंबर 2025 (शुक्रवार) रोजी आनंद, गुजरात येथे मोफत नेण्यात येणार आहे. आधार कार्डाची झेरॉक्स प्रति, मोबाईल क्रमांक आवश्यक आहे.
अमळगाव व परिसरातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या दृष्टीने हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरणार असून अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. समाजहिताच्या विविध कार्यांमध्ये सातत्याने योगदान देणाऱ्या सुरेश सोनवणे यांच्या पुढाकाराचे ग्रामस्थांकडून सर्वत्र कौतुक व्यक्त केले जात आहे.

