
एक पीक एक वाणच्या माध्यमातून बियाणे खरेदीत वाचले ४७ हजार रुपये…
अमळनेर:- तालुक्यातील १५ गावांमधील २८ गटातील ६७५ शेतकऱ्यांनी पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत सहभागी होत १ हजार १३२ हेक्टर क्षेत्राची स्पर्धेसाठी निवड झाली असून त्यासाठी तालुक्यातील शेतकरी गट कामाला लागले आहेत.
पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेल्या डांगर बुद्रुक या गावातील शेतकऱ्यांनी जय योगेश्वर गटाच्या माध्यमातून ४७ हजाराची बचत केली आहे. जिल्ह्यातील मुख्य वितरकाकडून महाराष्ट्र शासनाच्या एक पीक एक वाण या योजनेसाठी जिल्ह्यातील मुख्य वितरकने ८१० रुपये विक्री किंमत असलेली १ बॅग ७३० रुपये प्रमाणे आकारणी केली. शेतकऱ्यांनी ९२ बॅग घेतल्याने त्यातून प्रति बॅग ८० रुपये प्रमाणे ७ हजार ३६० रुपये वाचले. या बचतीचे गणित लक्षात घेऊन गटातील व गावातील उर्वरित इतर शेतकऱ्यांना योजनेचे महत्त्व लक्षात आल्याने फार्मर कप स्पर्धेतील शेतकरी गटात सहभागी होत एकत्रित कापूस वाणाची १०० शेतकरी एकत्र येऊन ७५० रुपये प्रति बॅग मिळणारी बॅग ६५० रुपये प्रमाणे खरेदी एकूण ४०० बॅग खरेदी करून एक रकमी ४० हजार रुपये वाचविले, अश्या आधीच्या ९२ व ४०० बॅग मिळून एकूण ४९२ बॅग कापूस बियाण्याच्या खरेदीतून ४७ हजार ३६० रुपये वाचवून फार्मर कप स्पर्धेतील डांगर बुद्रुकच्या जय योगेश्वर शेतकरी गटाने अश्या प्रकारे १०० शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पाणी फाउंडेशनच्या ज्ञानातून आगळा वेगळा इतिहास घडविला. फार्मर कप स्पर्धेमध्ये डांगर बुद्रुक गावातील जय योगेश्वर शेतकरी कापूस गट यांनी पाणी फाऊंडेशनच्या ज्ञानाच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन आपल्या गटाच्या माध्यमातून एकत्रित बियाणे खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी गटातील निमंत्रक शेतकरी पवन नेरकर, सतिलाल पाटील, देवीदास पाटील यांनी सर्व गटातील शेतकऱ्यांना एकत्र बियाणे खरेदी केल्यानंतर आपल्या गटाचे पैसे वाचतील व आपणास स्वस्तात बियाणे मिळेल याचे महत्त्व पटवून दिले त्यानंतर गटातील २० सदस्य ९२ बॅग खरेदी करण्यासाठी १ बॅग ८१० प्रमाणे ७४,५२० रू संकलित केले व थेट जिल्ह्याच्या ठिकाणी मोठ्या डीलर कडे खरेदीसाठी गेले त्यांनी पाणी फाऊंडेशनच्या फार्मर कप स्पर्धेमध्ये आम्ही भाग घेतला आहे आम्हाला एकत्रित गटासाठी ९२ बॅग कापूस बियाणे लागणार आहे आम्हाला किती कमी किमतीमध्ये बॅग द्याल हे सांगितल्यानंतर त्या डीलर ने एक कापूस बियाण्याची बॅग ७३० रुपयात देऊ असे सांगितले नंतर जय योगेश्वर शेतकरी गटाने ९२ बॅग खरेदी केल्या त्यामध्ये या गटाचे ७३६० रुपये वाचले प्रति १ बॅग मागे ८० रुपये वाचले यांची प्रेरणा घेऊन गटातील शेतकऱ्यांनी आपल्या इतर जमिनीसाठी ही आपण सर्वांनी मिळून एकत्रित बियाणे खरेदी करण्याचा निर्णय घेतला या निर्णयाची कुणकुण गावातील इतर शेतकरी बांधवांना लागताच त्यांनीदेखील आमचे बॅग मागे जर असे पैसे वाचणार असतील तर आम्ही देखील आपल्या सोबत एकत्रित बियाणे खरेदी करू व लागेल तेवढे पैसे आपणास देऊ हे गटाच्या निमंत्रक यांना सांगितले त्यांनी शेतकऱ्यांचा फायद्याचा विचार करता ज्या ज्या शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करावयाचे आहे त्यांनी बियाणे खरेदी करण्यासाठी पैसे एकत्रित करण्याचे आवाहन केले या आव्हानास गावातील १०० शेतकऱ्यांनी दाद दिली व महाराष्ट्र शासनाच्या एक पीक एक वान या योजनेसाठी तब्बल ४००बॅग त्याच जिल्ह्याच्या डीलर कडून बॅग खरेदी केल्या त्या प्रति १ बॅग ची किंमत ७५० रू होती तिच बॅग त्या डिलरकडून एकूण ४००बॅग खरेदी केलेमूळे प्रती बॅग ६५० रूपयला बसली व त्या सर्व ४०० बॅगाचे मिळून तब्बल ४००००रू वाचले अशा पद्धतीने जय योगेश्वर गटातील शेतकऱ्यांची प्रेरणा घेऊन गटातील व गावातील शेतकरी बांधवांचे तब्बल ४९२ बॅगाचे ४७३६० रुपये वाचले अशा पद्धतीचा आगळा वेगळा न भूतो ना भविष्य असा इतिहास फार्मर स्पर्धेतील शेतकरी गटा मुळे डांगर बुद्रुक या गावामध्ये घडला. तरी या गावातील जय योगेश्वर गटाची प्रेरणा घेऊन फार्मर कप स्पर्धेमध्ये इतर शेतकरी गटातील शेतकरी बांधवांनी व गावातील शेतकरी बांधवांनी प्रेरणा घ्यावी व आपल्या शेतीच्या निविष्ठा खते बियाणे मध्ये जर शेतकऱ्यांनी ठरवले तर हजारो लाखो रुपयांची बचत होऊ शकते.
अमळनेर तालुक्यातील १५ गावातील २८ गट स्थापन होऊन ६७५ शेतकरी व १ हजार १३२ एकर क्षेत्र स्पर्धेत निवडण्यात आले आहे. जसे गावे एकमेकांबरोबर स्पर्धा करीत असतात तसे आता शेतकरी गट हे एकमेकांना समजून स्पर्धा करीत असून तालुका पातळीवर पहिल्या येणाऱ्या शेतकरी गटास १ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार असून राज्य पातळीवर प्रथम येणाऱ्या गटास २५ लाख रुपये तर द्वितीय पारितोषिक १५ लाख रुपये तर तृतीय पारितोषिक १० लाख रुपयांचे असणार आहे,यात वाटर कप स्पर्धेत अमळनेर तालुक्यातील आनोरे गावची राज्य पातळीवर निवड झाली होती. म्हणून फार्मर कप स्पर्धेतही तालुक्यातील गट ही राज्यपातळीवर पोहचेल अशी स्पर्धा शेतकरी गट करतांना दिसत आहेत. संस्था म्हणून गटांचे काम ८० गुण, ज्ञान ३० गुण,उत्पादन प्रक्रिया ३० गुण, शास्वत शेती ३० गुण,शेतीची गुणवत्ता जपून उत्पादन व विक्री ३० गुण असे मूल्यांकन पद्धतीने फार्मर कप स्पर्धेत शेतकरी गटाची निवड करण्यात येणार आहे







