गुणवंत विद्यार्थी देशाचे भवितव्य असल्याचे स्वप्ना पाटील यांचे प्रतिपादन…
अमळनेर:- येथील प्रभाग क्रमांक १७ मध्ये श्रीराम कॉलनी मित्र मंडळाकडून नुकत्याच निकाल लागलेल्या १० वी पास गुणवंत विदयार्थी व विद्यार्थिनी सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभाप्रसंगी मार्गदर्शन करतांना १० वी पास गुणवंत विद्यार्थी कुटूंब व देशाचे भवितव्य असल्याचे मत सौ. स्वप्ना विक्रांत पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी सामजिक कार्यकर्ते दिलिप धोंडू ठाकूर होते. श्रीराम कॉलनी, शारदा कॉलनी, रामेश्वर कॉलनी, वडचौक, श्रीकृष्णपुरा व परिसरातील विद्यार्थी व विद्यार्थिनीच्या सत्कार सौ. स्वप्ना विक्रांत पाटील यांचे हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास माजी नगरसेवक विक्रांत भास्करराव पाटील, ज्येष्ठ पत्रकार जगन्नाथ बडगुजर, प्रल्हाद आप्पा पाटिल, उपसरपंच राजेंद्र भिमराव पाटिल, भैय्या चौधरी, नरेंद्र महाजन, सुभाष देवरे, नाना पावले, गणेश सोनवणे, प्रवीण ठाकूर, अशोक पाटील, जगदीश सोनार, भटू सैदाने, हितेश बारी, पवन बारी, समाधान नाथबुवा, मुंडके बंधू यांचे सोबत परिसरातील पालकांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्वांना पेढे भरवून आनंद साजरा करण्यात आला.